पापाच्या गर्भगृहात आयकर विभागाची अद्यापही ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 05:00 IST2022-01-30T05:00:00+5:302022-01-30T05:00:28+5:30

आर्वी येथील ‘कदम’ रुग्णालयात झालेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी तपासाला गती दिली. याप्रकरणात डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांना अटक करून कारागृहाची हवा दाखविली. आर्वी पोलिसांनी २२ जानेवारी रोजी एका बंद खोलीची झाडाझडती घेतली असता कपाटात तब्बल ९७ लाख ४२ हजार ७४५ रुपये मिळून आले होते. आर्वी पोलिसांनी तत्काळ याची माहिती आयकर विभागाला दिली.

Income tax department still 'no entry' in Papa's sanctuary | पापाच्या गर्भगृहात आयकर विभागाची अद्यापही ‘नो एन्ट्री’

पापाच्या गर्भगृहात आयकर विभागाची अद्यापही ‘नो एन्ट्री’

चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात अनेक रहस्यमय खुलासे झाले. त्यातच पोलीस तपासात बंद खोलीत तब्बल ९७ लाख ४२ हजार ७४५ रुपयांचे घबाड मिळून आले. याबाबत आयकर विभागाला आर्वी पोलिसांकडून पत्र व्यवहारही करण्यात आला. मात्र, या घटनेला तब्बल ८ दिवस उलटूनही आयकर विभागाने पापाच्या गर्भगृहात ‘एन्ट्री’ केली नसल्याची विश्वसनीय माहिती आहे. आर्वी येथील ‘कदम’ रुग्णालयात झालेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी तपासाला गती दिली. याप्रकरणात डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांना अटक करून कारागृहाची हवा दाखविली. आर्वी पोलिसांनी २२ जानेवारी रोजी एका बंद खोलीची झाडाझडती घेतली असता कपाटात तब्बल ९७ लाख ४२ हजार ७४५ रुपये मिळून आले होते. आर्वी पोलिसांनी तत्काळ याची माहिती आयकर विभागाला दिली. आज आठवडा उलटला तरी आयकर विभाग ‘कदम’ रुग्णालयात दाखल झालेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आयकर विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ कदम रुग्णालय गाठून डॉ. कदम यांच्या मालमत्तेची तसेच बेनामी मालमत्तेची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 

हार्डडिस्क काढण्यासाठी न्यायालयाची घेणार परवानगी
-    गर्भपात प्रकरण उजेडात आल्यानंतर आर्वी पोलिसांनी ‘कदम’ रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमधून सोनोग्राफी मशीन जप्त केली होती. यासाठी रेडीओलॉजीस्ट पाचारण करण्यात आला होता. मशीनची तपासणी करुन त्यातील हार्डडिस्क काढण्यासाठी पोलीस न्यायालयातून परवानगी घेणार असल्याची माहिती आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात मागणार पोलीस कोठडी
-    गर्भपात प्रकरणात डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आर्वी पोलिसांनी पुन्हा नव्याने दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलीस पुन्हा आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली असून तशी प्रक्रिया पोलिसांनी सुरु केलेली असल्याची माहिती आहे.
 

‘ती’ रोकड आर्वी पोलिसांच्या ताब्यात

-   आर्वी पोलिसांनी ‘कदम’ याच्या घरातील बंद खोलीत झाडाझडती घेऊन कपाटात ठेवून असलेल्या लोखंडी पेटीतून ९७ लाख ४२ हजार ७४५ रुपयांची रक्कम जप्त केली. पैसे मोजण्यासाठी तब्बल ९ तासांचा वेळ लागला होता. ही रक्कम मुलीच्या गर्भपात प्रकरणात जप्त केली असल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली आहे.

 

Web Title: Income tax department still 'no entry' in Papa's sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.