अपुऱ्या बसफेऱ्यांचा प्रवाशांना फटका
By Admin | Updated: August 12, 2016 01:50 IST2016-08-12T01:50:20+5:302016-08-12T01:50:20+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस ही प्रवाशांच्या सोयीसाठी की असुविधेकरिता असा प्रश्न येथील प्रवाशांना पडला आहे.

अपुऱ्या बसफेऱ्यांचा प्रवाशांना फटका
फेऱ्या वाढविण्याची मागणी
मोझरी (शेकापूर) : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस ही प्रवाशांच्या सोयीसाठी की असुविधेकरिता असा प्रश्न येथील प्रवाशांना पडला आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवासाची मुख्य वाहिनी असलेल्या बसने या परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्रवासी ये-जा करतात. मात्र बसफेरींची मर्यादित संख्या पाहता येथील प्रवाशांची ताटकळ होते.
मोझरी (शेकापूर) येथून दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी कामानिमित्त वर्धा, हिंगणघाट येथे ये-जा करतात. मोठ्या संख्येने बसने प्रवास करणारे प्रवासी असताना वर्धा आगारातून वर्धा-वरूड व वर्धा-साती अशा दोनच बसफेऱ्या आहे. तसेच हिंगणघाट आगारातून हिंगणघाट-पोटी-साती अशा मोजक्या बसफेऱ्या मोझरीमार्गे ये-जा करतात. त्यामुळे येथील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. मोझरी (शे.) स्थानकावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेकांना बसमध्ये चढता येत नाही. खासगी वाहनाने प्रवास करणे धोक्याचे असून खर्चिक ठरत आहे.(वार्ताहर)