स्त्री शिक्षणानेच अंधश्रद्धा निर्मूलन

By Admin | Updated: September 27, 2014 23:21 IST2014-09-27T23:21:12+5:302014-09-27T23:21:12+5:30

जन्मापासून मृत्यूपर्यंत महिलेला सन्मानजनक वागणूक मिळत नाही. तिला अहवेलनेला समोरे जावे लागते. कारण भारतीय समाजव्यवस्था ही पुरुषप्रधान आहे. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेमुळे बाईच्या अंगात येते.

Improve superstitions by women education only | स्त्री शिक्षणानेच अंधश्रद्धा निर्मूलन

स्त्री शिक्षणानेच अंधश्रद्धा निर्मूलन

वर्धा : जन्मापासून मृत्यूपर्यंत महिलेला सन्मानजनक वागणूक मिळत नाही. तिला अहवेलनेला समोरे जावे लागते. कारण भारतीय समाजव्यवस्था ही पुरुषप्रधान आहे. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेमुळे बाईच्या अंगात येते. कारण दु:ख व्यक्त करण्याचा तो एक सोपा मार्ग असतो. सोबतच पैसा, प्रतिष्ठा, मिळविण्यासाठी तर अनेकदा आळशी कामचुकार असणारी महिला, कुटुंबात त्रास सहन करणाऱ्या महिला अंगात देवी आणण्याचे नाटक करतात. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्त्री शिक्षित होणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी व्यक्त केले.
घटस्थापनेच्या काळात मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरूष यांच्या अंगात देवी येण्याचे प्रमाण वाढते. अंगात देवी आणून व चमत्कार करून आपली प्रसिद्धी करण्याचा प्रयास अनेक देवी, बाबा करतात. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. न्यू गणेश मंडळ धंतोली, गणेश नवयुवक मंडळ वायगाव (नि.), गणेश मंडळ पिपरी मेघे आदि गणेश मंडळासह नवयुवक बाल गणेश मंडळ मिरापूर येथे प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी समारोपीय कार्यक्रमात मीरापूर येथे पोलीस पाटील पांडुरंग गोडे, माजी सरपंच मदन चांभुळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चेतन मीरापूरकर यांनी केले. आभार सौरभ गोडे यांनी मानले.
प्रबोधन कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र शासनाने केलेल्या जादुटोणा विरोधी कायद्याची माहिती तसेच अंगात आल्यानंतर देवी, बाबा करत असलेला हातात जळता कापूर खेळणे व तोंडात गिळणे हा चमत्कार गजेंद्र सुरकार यांनी करून दाखविला यासह अनेक चमत्कार करून त्यमागील बदमाशी, हातचलाखी समजावून सांगितले. यशस्वीतेसाठी श्रेया गोडे, रेशमा सुरकार, शुभम घाटोळे, मयूर राऊत, मयूर डफळे, वैभव सुरकार, सुधाकर मिसाळ, प्रकाश कांबळे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Improve superstitions by women education only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.