शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

व्याघ्र प्रकल्पाच्या मंजुरीने वाढले बोरचे महत्त्व

By admin | Updated: July 3, 2014 23:42 IST

नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण असलेल्या आणि वाघासह विविध प्राणी व पक्ष्यांचा अधिवास असलेल्या जिल्ह्यातील बोर अभयारण्याला केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने वाघासाठी संरक्षित

वर्धा : नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण असलेल्या आणि वाघासह विविध प्राणी व पक्ष्यांचा अधिवास असलेल्या जिल्ह्यातील बोर अभयारण्याला केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने वाघासाठी संरक्षित असलेला ‘व्याघ्र प्रकल्प’ म्हणून आरक्षित केला आहे. ताडोबा, मेळघाट यानंतर राज्यातील हा सहावा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे.वन्यजीव अभयारण्य म्हणून १९७० मध्ये शासनाने या प्रकल्पाला मान्यता दिली होती. वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर १३८.१२ चौरस किलोमिटर परिसरात हा प्रकल्प विस्तारलेला आहे. व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाल्यामुळे व्याघ्र वन्यप्राणी व विविध प्रजातींच्या संरक्षणाला यामुळे गती मिळणार आहे.बोर नदीच्या परिसरातील समृद्ध निसर्ग आणि समृद्ध वनराई असलेल्या दक्षिण सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये बोर व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार आहे. या अभयारण्याच्या परिसरात नवरगाव, गरमसूर, महाकाली, ढगा, बांगडापूर, गारपीट, शिवणफळ, ताडगाव, पोहणा हा निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. बोर अभयारण्य व न्यू बोर अशा एकूण १३८.१२१४ किलोमिटर परिसरात या प्रकल्पाचा विस्तार आहे.बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत असणाऱ्या बोर या नदीवरील सिंचन प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ३७६.३२ कि़मी. आहे. धरणातील संपूर्ण जलसाठा १३८.७५ द.ल.घ.मी. असून, उपयुक्त पाणीसाठा १२७.४२ द.ल.घ.मी. आहे. पूर्ण संचय पातळी ३३०.४० मीटर आहे. अभयारण्यामधून वाहणाऱ्या बोर नदीवर हे धरण उभारले असून १९७० साली पूर्ण झाली आहे. या धरणाला यशवंत जलप्रकल्प म्हणूनही ओळखल्या जाते. बोर अभयारण्याची ओळख विपूल जैवविविधतेसाठी असून, येथे बोर नदीत मत्स्यजन्य प्राणी, जलचर, पक्षी व फुलांच्या वनस्पतीची रेलचेल दिसून येते. फुल आणि पक्षी यांना विशिष्ट ऋतूमध्ये आवश्यक असणारे नैसर्गिक खाद्य येथे विपूल प्रमाणात उपलब्ध होत असते. उपयुक्त वनस्पतींमध्ये, कॉसिया, टोरा, टेतेला, कॅसिया अ‍ॅटी कळटा, ट्रीबूलस टेरिटेरीज, फ्लेमेगिया, वनभेंडी, वेलची, वाघोरी या वनस्पतींसह उपयुक्त पिळदरा बांबू, सागाचे जंगलही आढळून येते.या अभयारण्यात नुकतीच नागपूर व वर्धा जिल्ह्यातील १६ चौरस किलोमिटरची पुन्हा भर पडली असून, केंद्र सरकारने बोर अभयारण्याला वाघाचे आश्रयस्थान म्हणून घोषित केले आहे. नव्याने उदयास आलेल्या या व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघ, बिबट याबरोबरच अनेक प्राणी मुक्तसंचार करताना दिसतात. अस्वली, रानडुक्कर, निलगाय (रोही), सांभार, चितळ, भेडकी, लांडगे, कोल्हे, रानकुत्री, रानमांजर, खवले-मांजरे, साळींदर, मसण्या उद, उडती खार आणि मोरांसोबतच सर्व गरूड, तुर्रेवाले गरूड, बहिरी ससाणा आणि अनेक पक्षी या जंगलात नोंद पक्षी निरीक्षक डॉ. सगिम अली आणि मारूती चित्तमपल्ली यांनीही पक्षीनिरीक्षण केले आहे. नुकत्याच झालेल्या वन्यप्राणी गणनेनुसार बोर वाघ्र प्रकल्पामध्ये ४ वाघ, ८ ते १० बिबट,७०० चितळ, ५०० सांभार, २५ अस्वली, १५ चिकारा, चौसिंगा, रानकुत्रे, निलगाय, रानडुक्कर, उदमांजर, सायाळ, मोर, लांडोर आदी वन्यप्राण्यांचा अदिवास असल्याची नोंद झाली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)