पुनर्वसित गावांमध्ये गृहनिर्माण प्रकल्प राबवा
By Admin | Updated: December 19, 2015 01:59 IST2015-12-19T01:59:06+5:302015-12-19T01:59:06+5:30
विविध सिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन करताना पुनर्वसित झालेल्या कुटुंबांना विविध गृहनिर्माणाच्या योजना एकत्र करून ...

पुनर्वसित गावांमध्ये गृहनिर्माण प्रकल्प राबवा
मुख्यमंत्र्यांकडून आढावा : पुनर्वसनाचे वर्धा मॉडेल तयार करा
वर्धा : विविध सिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन करताना पुनर्वसित झालेल्या कुटुंबांना विविध गृहनिर्माणाच्या योजना एकत्र करून त्या राबवा आणि पथदर्शक प्रकल्प म्हणून वर्धा जिल्ह्यापासून सुरुवात करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात.
वर्धा जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अर्थ व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तसेच आमदार डॉ. पंकज भोयर, रणजित कांबळे, समीर कुणावार, अमर काळे तसेच अपर मुख्य सचिव के.पी. बक्षी, आनंद कुळकर्णी, डी.के. जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर, ग्रामविकास सचिव व्ही. गिरीराज, वन विभागाचे सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव के.एच. गोविंदराज, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना आदींची उपस्थिती होती.