‘त्या’ निर्णयाची अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:15 IST2018-12-16T00:14:43+5:302018-12-16T00:15:01+5:30
उच्च न्यायालयाने दिलेल्या गोवारी हे आदिवासीच आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी शनिवारपासून वर्धा जिल्हा आदिवासी गोवारी जमात समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

‘त्या’ निर्णयाची अंमलबजावणी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उच्च न्यायालयाने दिलेल्या गोवारी हे आदिवासीच आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी शनिवारपासून वर्धा जिल्हा आदिवासी गोवारी जमात समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदर आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
गोवारी समाज बांधवांनी आज ‘११४ शहीदो के सन्मान मे, गोवारी जमात मैदान मे’ अशा घोषणा देत सदर आंदोलनादरम्यान आपला आवाज बुलंद केला. उच्च न्यायालयाने दिलेल्या गोवारी हे आदिवासीच या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाने तात्काळ करावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
सदर आंदोलनाचे नेतृत्त्व सुधाकर चामलाटे, दिनेश कुसराम, रोशन राऊत, देवानंद दुधकोहळे, हनुमंत नागोसे यांनी केले. सदर आंदोलनात वर्धा शहरासह जिल्ह्यातील विविध गावांमधील गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.