नांदगावचा कचरा डेपो तात्काळ हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:37 IST2017-12-27T23:37:18+5:302017-12-27T23:37:24+5:30

Immediately delete Nandgaon waste depot | नांदगावचा कचरा डेपो तात्काळ हटवा

नांदगावचा कचरा डेपो तात्काळ हटवा

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : नांदगाव बोरगाव ग्रा.पं. लगत असलेला घनकचरा व्यवस्थापन डेपो तात्काळ हटविण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन स्थानिक न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
नगर पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन डेपो हा नांदगाव बोरगाव ग्रा.पं.च्या केवळ ५०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे त्याचा ग्रामस्थांना त्रास होतोत आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसली असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर कचरा डेपोत ओला, सुका कचऱ्या शिवाय मृत जनावरेही आणून टाकली जात आहेत. येथून ये-जा करणाऱ्यांना नाकाला रुमाल लावूनच पुढील प्रवास करावा लागत आहे. या कचरा डेपोतील मनमर्जी कारभारामुळे मानवी जीवनास घातक ठरेल अशा वायूचीही निर्मिती होत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता हा कचरा डेपो येथून दुसऱ्या जाणी हलविण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीवर वेळीच विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. न. प. मुख्याधिकाºयांना निवेदन देताना छत्रपती वादाफळे, सरपंच प्रदीप डंभारे, संजय रहाटे, दामोजी कुकडे, हेमंत पोगले यांच्यासह नांदगाव बोरगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Immediately delete Nandgaon waste depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.