तिगाव ते आमला रस्त्याचे बांधकाम त्वरित करा
By Admin | Updated: January 17, 2015 02:22 IST2015-01-17T02:22:45+5:302015-01-17T02:22:45+5:30
शेतकरी, शेतमजूर नागरिकांना सोयीच्या ठरणाऱ्या तिगाव ते आमला रस्त्याचे तात्काळ बांधकाम करावे, अशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना ग्रामपंचायत कार्यालय...

तिगाव ते आमला रस्त्याचे बांधकाम त्वरित करा
वर्धा : शेतकरी, शेतमजूर नागरिकांना सोयीच्या ठरणाऱ्या तिगाव ते आमला रस्त्याचे तात्काळ बांधकाम करावे, अशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना ग्रामपंचायत कार्यालय तिगावच्या वतीने करण्यात आली. या संदर्भातील ग्रामसभेच्या ठरावाची सत्यप्रत व गावकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन विभागाला सादर करण्यात आले आहे.
तिगाव ते आमला या जुन्या रस्त्याच्या आजूबाजूला अल्पभूधारक शेतकऱ्याच्या जमिनी आहेत. त्या रस्त्यावर झाडेझुडपे वाढलेली आहे. दुसरीकडे वीटभट्टीधारक या रस्त्याने माती व मुरूम अनेक वर्षापासून नेत आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. अशा परिस्थितीत रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासह शेतमाल घरी आणण्यासाठी अडचणींचे जात आहे. त्यामुळे हा रस्ता तत्काळ होणे अत्यावश्यक आहे. दुसरीकडे माडा हे जागृत देवस्थान असून राज्य शासनाने याला तिर्थस्थळाचा दर्जा दिला आहे. या स्थळी झाडगाव, दिग्रस, उमरी तिगाव, रोठा, आमला, दहेगाव, लोनसावळी, वायफळ, डोरली, धामणगाव, वाठोडा येथील भक्तगण स्वयंपाकासाठी येतात. लोनसावळी, डोरली, धामणगाव, वाठोडा येथील नागरिकांना वर्धेला जाण्यासाठी प्रथम वायफडला यावे लागते. धामणगावरून आमलापर्यंत पक्का रस्ता झाला आहे. याच रस्त्याला तिगाववरून नियोजित होणारा रस्ता जोडल्यास ७ ते १० कि.मी.चे अंतर कमी होऊ शकते. त्यामुळे तिगाव ते आमला रस्त्याचे कामही तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात सरपंच शीतल मसराम, जि.प. सदस्य मनोज चांदूरकर, उपसरपंच साधूजी इरपाते, आमलाचे सरपंच मोहन इंगळे, मंगला महल्ले उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)