शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तत्काळ सातवा वेतन आयोग लागू करा अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:01 IST

अडीच वर्षांचा कालावधी लोटूनही शिक्षक व कर्मचाऱ्यांना देय असलेला सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने जिल्हाकचेरीसमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देअजय भोयर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अडीच वर्षांचा कालावधी लोटूनही शिक्षक व कर्मचाऱ्यांना देय असलेला सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने जिल्हाकचेरीसमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.सातवा वेतन आयोग लागू करा या मागणीकरिता वेळोवेळी संघटनेच्यावतीने आंदोलने करून देखील शासन स्तरावर आश्वासना पलीकडे काही ठोस असा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी बाबत शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांची समिती नेमलेली आहे. परंतु समितीचे कामकाज अतिशय संथ गतीने सुरू असून जाणीव पूर्वक विलंब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप निवेदनातून केलेला आहे.राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना यथाशीघ्र सातवा वेतन आयोग लागू करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीचे अजय भोयर, अनिल टोपले, पुंडलिक नागतोडे, गजानन साबळे, संजय बारी, कुंडलिक राठोड, सुनील गायकवाड, रहिम शहा, मनोहर वाके, मुकेश इंगोले, अमोल वाशिमकर, गजानन कोरडे, मनिष मारोडकर, उमेश खंडार धिरज समर्थ, भूषण डहाके, विजय चौधरी, प्रशांत दुधाने, विलास बरडे, दत्तात्रय राऊळकर, दिलीप मारोटकर, हेमंत डोर्लीकर, मनोज मोहता यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.१८ हजार प्रयोगशाळा कर्मचाºयांवर अन्यायपिंपळखुटा- गत ३ वेतन आयोगाच्या त्रुटी अपूर्ण असल्याने राज्यातील तब्बल १८ हजार प्रयोगशाळा कर्मचाºयांवर अन्याय होत आहे. सातव्या वेतन आयोगाची सुरुवात होण्यापूर्वी या त्रुटी दूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे राज्य महासचिव प्रभाकर गायकवाड यांनी केली आहे. राज्य माध्यमिक शिक्षण विभागात ९७३२ प्रयोगशाळा व ९६५४ प्रयोगशाळा परिचरांवर विज्ञान आयोगाकडून सतत अन्याय होत आहे. ४ थ्या वेतन आयोगात राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रयोगशाळा सहाय्यकांना ९७५- २५- १९५०-१०, १९४० अशी वेतनश्रेणी मिळाली तर वेतनाने १२००-३०-१४४०-४० -२०४० अशी वेतनश्रेणी दिली. पाचव्या वेतन आयोगाला ३२००-८५-४९०० अशी वेतन श्रेणी राज्य शासनाने दिली. केंद्राची याच पाचव्या वेतन आयोगात ४०००-१००-६००० अशी होती. सहाव्या वेतन आयोगात राज्यातील प्रयोगशाळा सहाय्याकांना ५२००-२०२०० वेतनबँड व २०० रुपये ग्रेड पे अशी वेतन श्रेणी दिली. या वेतनश्रेणीतील तफावत दूर करावी, काळबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी धुळखात पडली आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील प्रयोगशाळा व परिचर यांना वेनतश्रेणी देण्याची मागणी आहे.आकृतीबंध व वेतनतृटीबाबत आम्ही न्यायालयात न्याय मागितला आहे. मात्र न्याय मिळण्यास विलंब येत असून राज्य शिक्षण विभाग प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ खेळत आहे.- प्रभाकर गायकवाड, राज्य महासचिव प्रयोगशाळा.

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोग