सेन्सॉर बोर्डातील सदस्यांची तत्काळ हकालपट्टी करा
By Admin | Updated: November 19, 2014 22:47 IST2014-11-19T22:47:08+5:302014-11-19T22:47:08+5:30
रंग रसिया, हैदर, सिंघम रिर्टन आणि पूर्वीच्या ओ माय गॉड, रागिनी एम.एम.एस.२, भुलभुलैया आदी अनेक चित्रपटांतून राष्ट्रीय व हिंदूच्या धार्मिक अस्मितेचा जाणीवपूर्वक अवमान केला आहे.

सेन्सॉर बोर्डातील सदस्यांची तत्काळ हकालपट्टी करा
हिंदू जनजागृती समितीची मागणी : अधिकारी वर्गाला निवेदन
वर्धा : रंग रसिया, हैदर, सिंघम रिर्टन आणि पूर्वीच्या ओ माय गॉड, रागिनी एम.एम.एस.२, भुलभुलैया आदी अनेक चित्रपटांतून राष्ट्रीय व हिंदूच्या धार्मिक अस्मितेचा जाणीवपूर्वक अवमान केला आहे. समाजमनावर विपरित परिणाम करणाऱ्या अशा प्रकारच्या आक्षेपार्ह चित्रपटांना संमती देणाऱ्या सेन्सॉर बोर्डातील सदस्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनानुसार अशा चित्रपटांच्या विरोधात अनेकदा तक्रारी आणि आंदोलने करूनही केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) काहीही करत नाही. त्यामुळे देश आणि धर्म हिताच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. दुसरीकडे हिंदु सोडून इतर धर्मियांच्या भावनांची दखल मंडळांकडून तात्काळ घेतली जात आहे. मंडळात भ्रष्टाचार होत असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डची सध्याची पूर्ण समिती विसर्जित करून हिंदुच्या भावानांची दखल घेणारी अन् संस्कृती जोपासणारी नवीन समिती गठीत करण्याची मागणी शिवाजी चौकात आंदोलकांच्या वतीने निदर्शनाद्वारे आणि निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंदळात शिवसेना सेलू तालुका प्रमुख पवन गोहत्रे, महिला शहर प्रमुख अमृता कोट्टेवार, जयश्री भुरे, भारती कोटंबकर, सोनाली लाडेकर, लता तिवारी, शशीकांत पाध्ये उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)