अवैधपणे वृक्षांची केली कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:14 IST2018-02-07T23:13:57+5:302018-02-07T23:14:18+5:30

रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोठ्या वृक्षांमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे कारण पूढे करीत कंत्राटदाराकडून थेट अवैध पद्धतीने वृक्ष कत्तल केली जात आहे. हा प्रकार टाकळी (चणा) ते बोपापूर मार्गावर बघावयास मिळत आहे.

Illegally slaughtered trees | अवैधपणे वृक्षांची केली कत्तल

अवैधपणे वृक्षांची केली कत्तल

ठळक मुद्देटाकळी (चणा) ते बोपापूर मार्गावरील प्रकार : वृक्षसंवर्धनाच्या उद्देशाला फाटा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोठ्या वृक्षांमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे कारण पूढे करीत कंत्राटदाराकडून थेट अवैध पद्धतीने वृक्ष कत्तल केली जात आहे. हा प्रकार टाकळी (चणा) ते बोपापूर मार्गावर बघावयास मिळत आहे. ५ किमीच्या मार्गावरील मोठी वृक्ष अवैधपणे तोडण्यात आली असून या प्रकारामुळे वृक्षसंवर्धनाच्या उद्देशालाच फाटा मिळत असल्याची चर्चा परिसरात होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याची गरज आहे.
देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) गावालगतच्या टाकळी (चनाजी) आणि बोपापूर (दिघी) या ५ किलोमीटरच्या अंतरावरील रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेली बाभुळीची झाडे तोडण्याचा सपाटा गेल्या तीन दिवसांपासून सुुरु आहे. याबाबत काही वृक्षप्रेमी ग्रामस्थांनी विचारणा केली असता कंत्राटदाराकडून उडवा-उडवीचे उत्तरे देण्यात आली. उल्लेखनीय म्हणून या मार्गावरील केवळ मोठी आणि सरळ झाडेच कापली जात आहेत. त्यामुळे कंत्राटदाराच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गत तीन दिवसांत सुमारे ४० मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. सुरू असलेल्या या वृक्ष कत्तलीला कुणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न उपस्थित करीत अवैध वृक्षतोड करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे.
केवळ ३० वृक्ष तोडण्याचा दिला कंत्राट
या मार्गावरील ३० मोठी वृक्ष ही रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी असल्याने ती तोडण्याचा कंत्राट दिला आहे;पण कंत्राटदार अधिकचे वृक्ष तोडत असल्याची माहिती मिळाल्याने त्याला काम थांबविण्याचे सांगण्यात आले आहे. सध्याही तसेच होत असेल तर सुरू घटनास्थळी जाऊन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवळीचे कनिष्ठ अभियंता भूत यांनी दिली.
वनविभागाच्या अधिकार क्षेत्रात नाही-सोनटक्के
टाकळी (चनाजी) ते बोपापूर मार्गालगतचे वृक्ष आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत. ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतात. त्यामुळे या प्रकाराबाबत आमच्याकडे काही माहिती नाही, असे वनपाल सोनटक्के यांनी सांगितले.

Web Title: Illegally slaughtered trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.