रेतीच्या अवैध साठेबाजीला ऊत

By Admin | Updated: July 30, 2015 01:58 IST2015-07-30T01:58:55+5:302015-07-30T01:58:55+5:30

रेतिघाटांची मुदत संपण्याकरिता केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे.

The illegal sandstorming in the sand | रेतीच्या अवैध साठेबाजीला ऊत

रेतीच्या अवैध साठेबाजीला ऊत

चढ्या भावात विक्री : शासनाच्या महसुलाला लागतेय कात्री
तळेगाव (श्या.पंत.) : रेतिघाटांची मुदत संपण्याकरिता केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे घाटधारक तसेच अवैधरित्या रेतरीचा उपसा करणाऱ्यांनी रेतीची साठेबाजी सुरू केली आहे. परिसरात अनेक ठिकाणी लहान-मोठे रेतीचे ठिय्ये आढळून येत आहे. यात रेतीची चढ्या भावाने विक्री केली जात असून शासनाचा महसूलही बुडविला जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तळेगाव परिसरात अनेक ठिकाणी रेतीचा अवैध साठा आढळून येत आहे. हजारो ब्रास रेतीची चोरी करून ती या परिसरातील गावशिवारात साठवली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या अवैध रेतीसाठ्याकडे महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष होताना दिसते. तळेगाव नजीकच्या भिष्णूर, भारसवाडा, नदी पात्रातून रात्रीच्या वेळी व शासकीय सुट्यांच्या दिवशी रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात असल्याचे दिसते. भिष्णूर, भारसवाडा, गोदावरी, परतोडा, इस्लामपूर येथून सर्रास रेती चोरी होत असल्याचे निदर्शनास येते. नदीवरून अवैधरित्या आणलेली रेती साठवून ठेवली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, या पसिरतील एकाही रेती साठ्यावर महसूल विभाग वा संबंधित तलाठ्याने कारवाई केली नाही. उलट रेती माफिया त्यातून लाखो रुपये अवैधरित्या कमवित आहे. महसूल विभाग व पोलिसांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)

Web Title: The illegal sandstorming in the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.