अवैध उत्खनन करणारा लागला वनविभागाच्या गळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 23:59 IST2019-06-25T23:59:19+5:302019-06-25T23:59:44+5:30
हिंगणघाट तालुक्यातील मौजा दोंदुडा परिसरातील झुडपी जंगलात अवैध उत्खन्न करून मुरूमची वाहतूक करणाऱ्या एकाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

अवैध उत्खनन करणारा लागला वनविभागाच्या गळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील मौजा दोंदुडा परिसरातील झुडपी जंगलात अवैध उत्खन्न करून मुरूमची वाहतूक करणाऱ्या एकाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एम. एच. ३२ पी. १३१० क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली तसेच एम. एच. ३२ पी. ११४६ क्रमांकाचा ट्रॅक्टर तसेच मुरुम जप्त करण्यात आला आहे.
हा ट्रॅक्टर सुभाष छत्रपती ढगे यांच्या मालकीचा असून तो मालकाच्या इशाºयावर राकेश अशोक पवार हा टॅक्टर चालक चालवत होता. शिवाय अवैध पद्धतीने उत्खन्न करून याच ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर टॉलीद्वारे मुरूमाची वाहतूक केली जात असल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. ही कारवाई वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहा. सचिन कापकर, वनरक्षक अमोल पिसे, उल्हास पवार यांनी केली. या कारवाईमुळे महसूल विभागाचे पितळच उघडे पडले आहे.