१४५ फुटपाथ दुकानदारांना बेकायदेशीर नोटीस

By Admin | Updated: December 8, 2014 22:39 IST2014-12-08T22:39:03+5:302014-12-08T22:39:03+5:30

येथील फुटपाथ दुकानदारांना अतिक्रमणधारी संबोधून १४५ दुकाने हटविण्याचा व न हटविल्यास साहित्य जप्त करून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचा बेकायदेशीर नोटीस दुकानदारांना देण्यात आला आहे़

Illegal notice to 145 pavement shoppers | १४५ फुटपाथ दुकानदारांना बेकायदेशीर नोटीस

१४५ फुटपाथ दुकानदारांना बेकायदेशीर नोटीस

हिंगणघाट : येथील फुटपाथ दुकानदारांना अतिक्रमणधारी संबोधून १४५ दुकाने हटविण्याचा व न हटविल्यास साहित्य जप्त करून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचा बेकायदेशीर नोटीस दुकानदारांना देण्यात आला आहे़ या प्रकारामुळे दुकानदारांत असंतोष पसरला आहे़ ही कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे़ याबाबत ऩप़ मुख्याधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे़
मूलभूत गरजांची पूर्तता (अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण) करण्याचे संवैधानिक कर्तव्य हे केंद्र, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रथम कर्तव्य आहे़ त्याची पूर्तता न केल्यानेच येथील नागरिकांनी परिवाराचे पालन-पोषण करण्यासाठी ३० ते ४० वर्षांपूर्वी फुटपाथवर दुकाने थाटली़ कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता त्यांना विस्थापित करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. याबाबत फुटपाथ संघटनेचे प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो दुकानदारांनी ऩप़ मुख्याधिकारी जगताप यांची भेट घेत निवेदन सादर केले़ शिवाय फुटपाथ दुकानदारांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली़
यानंतर तहसीलदार दीपक करंडे यांनाही निवेदन देण्यात आले़ यात अतिक्रमण कारवाईचा पुनर्विचार होईपर्यंत दुकानदारांना त्यांच्या मुलभूत अकिधारांपासून वंचित ठेवल्यासारखे होईल. यामुळे पर्यायी व पुनर्व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण हटाव कारवाईस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली़ दुकानदारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने तहसील व पालिका प्रशासनाने विचारपूर्वक कारवाई करावी, अशी मागणीही फुटपाथ दुकानदार संघटनेमार्फत करण्यात आली़ अन्यथा नगर परिषदेसमोर जहर खाओ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला़
निवेदन सादर करताना सु.बे. फुटपाथ संघटनेचे अध्यक्ष एस.ए. काजी, मिर्झा परवेज बेग, अब्बास, राकेश शर्मा, राजेश बैसवारे, शेख सलीम शेख हयातुल्ला, दिनेश हरबडे, शेख मजीद शेख अमीर, रमेश साबळे, प्रवीण जगताप, शेख सलीम फारूकी, वसंत वाटकर, जब्बार खा गफ्फार खा, अरविंद भुसारी, शेख जफर शेख अहेमद, मनोज देवगिरकर, सुरेश टेकाम, अब्दुल कलीम अब्दुल सत्तार, शेख आसिफ, किशोर ठाकरे आदी उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Illegal notice to 145 pavement shoppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.