अवैध दारूविक्री; ठाणेदारांचा कर्मचार्‍यांना इशारा

By Admin | Updated: May 24, 2014 23:52 IST2014-05-24T23:52:01+5:302014-05-24T23:52:01+5:30

सेलूसह घोराड व अन्य परिसर तसेच आकोली परिसरातील दारुविक्रीबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्तानंतर ठाणेदारांनी दखल घेत कडक शब्दात पोलिसांना कानपिचक्या

Illegal liquor sale; Thackeray's warning to employees | अवैध दारूविक्री; ठाणेदारांचा कर्मचार्‍यांना इशारा

अवैध दारूविक्री; ठाणेदारांचा कर्मचार्‍यांना इशारा

सेलू : सेलूसह घोराड व अन्य परिसर तसेच आकोली परिसरातील दारुविक्रीबाबत लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्तानंतर ठाणेदारांनी दखल घेत कडक शब्दात पोलिसांना कानपिचक्या देत खबरदारीचा इशारा दिला. ठाणेदाराच्या या इशार्‍यामुळे तालुक्यातील दारू हद्दपार होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.लोकमतचे वृत्त वाचून त्यांनी वृत्तातील खरेपणाबद्दल सहमती दर्शवित सर्वच पोलिसांना खडसावले. कुठेही दारूविक्री व जुगार खपवून घेतला जाणार नाही, असा दमही त्यांनी पोलिसांना दिल्याचे एका पोलीस कर्मचार्‍यानेच प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.

ठाणेदार उल्हास भुसारी हे गुन्हे शाखेत असताना इतरत्र अवैध दारूविक्रीची खबर मिळताच धाड टाकून विक्रेत्यांवर अंकुश लावत होते. आता खुद्द ते सेलू पोलीस ठाण्याचे ठाणेदार म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्याच ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्री होत असेल तर लोकांमध्ये काय संदेश जाईल, याची काळजी घेत

सेलू शहरासह ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूविक्रीची नवनवीन शक्कल लढवून लपून-छपून दारूविक्री करणे सुरू आहे. खुलेआम दारूविक्रीला लगाम असली तरी काही ग्रामीण भागात गावठी दारू विकली जात आहे. मोबाईलवर देशी-विदेशी दारू अधिकचे शुल्क आकारून चढय़ा भावात विकली जात आहे. पोलिसांनी याकडे कोणत्या आमिषाला बळी पडून कानडोळा सुरू केला, हा कदाचित ठाणेदारासमोरील प्रश्न असावा. यामुळेच त्यांनी अशा घटनांकडे दुर्लक्ष करणार्‍या पोलिसांना दम दिला. ठाणेदारांच्या कानपिचक्यांमुळे भ्रष्ट असणार्‍या काही पोलीस कर्मचार्‍यांची भंबेरी उडाली आहे. सेलू तालुक्यातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांनी धाडसत्र राबवावे, जुगार अड्डे नेस्तनाबुत करावे व गावठी दारूही हद्दपार करावी, अशी मागणी ग्रामस्थ करताहेत.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Illegal liquor sale; Thackeray's warning to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.