शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

डायल ११२ वर केला फेक कॉल तर तुरुंगात जाल, दंडही भरावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 16:37 IST

रिस्पॉन्स टाइम १० मिनिटांवर : ५,६१९ जणांच्या मदतीला धावले पोलिस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डायल ११२ या हेल्पलाइनवर कॉल करताच काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळावर पोहचत आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्यांना दिलासा मिळत आहे. मात्र, काही जण फेक कॉल करीत असल्याचे प्रकारही उघडकीस येत असल्याने अशा लोकांवर आता थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. यात दोषी आढळल्यास कारावास व दंडाची शिक्षाही होऊ शकते.

जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत नियंत्रण कक्षात तब्बल ५,६१९ कॉल्स प्राप्त झाले असून, अवघ्या १० मिनिटांत पोलिस मदतीला धावले आहेत. अडचणीत सापडलेल्या लोकांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी डायल ११२ ही हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. यावर कॉल येताच काही मिनिटांतच पोलिस पथक घटनास्थळी दाखल होते. अपघातग्रस्तांसाठी ही सेवा देवदूतच ठरत आहे. अनेकांचे प्राण वाचविण्यात पथकाला आले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या मदतीलाही है पथक धावत आहे. त्यामुळे मदत मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, काही टवाळखोर गंमत म्हणून कॉल करीत आहेत. अशावेळी मदतीची खरोखरच गरज असलेल्या व्यक्तीचा कॉल प्रतीक्षेत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांची आता खैर नाही.

स्वतंत्र 'वॉर रूम'मधून रात्रंदिवस राहतो 'वाँच'■ एसपी नुरुल हसन यांच्या देखरेखीत स्वतंत्र वॉर रूममधील आठ ते दहा संगणकाच्या माध्यमातून रात्रंदिवस ही यंत्रणा कार्यरत आहे. सहायक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने, कॉल पुढे पाठविणारे आठ डिस्पॅचर, अभियंता रुकेश ढोले, सिद्धार्थ बोरकर हे बारीक लक्ष ठेवून आहेत.

२९० ज्येष्ठांच्या तक्रारीडायल ११२ वर सर्वाधिक घरगुती वादाच्या घटनांमुळे कॉल्स येतात. अशातच सुनेने घरून काढून दिले. मुलगा, सून सांभाळत नाहीत, आदी विविध कारणांतून अशा २९० ज्येष्ठांनी डायल ११२ कडे कॉल करून संरक्षण मागितले.

प्राप्त तक्रारी अन् रिस्पॉन्स टाइमवर एक नजरमहिना                         प्राप्त कॉल्स                      रिस्पॉन्स टाइम (मिनिटांत)जानेवारी                          १,३९४                                  ०९.४१फेब्रुवारी                          १,३५५                                  १३.२४मार्च                                १,४९९                                  १०.४९एप्रिल                              १,३७१                                   १०.२१

फेक कॉल करणाऱ्यांविरुद्ध फौजदारीडायल ११२ वर फेक कॉल करून चुकीची माहिती देणाऱ्यांविरुद्ध एफआ- यआर नोंदविला जातो. त्याला पुढील प्रक्रियेत शिक्षा किंवा दंडही होऊ शकतो. वर्धा जिल्ह्यात असे गुन्हे दाखल केले आहेत. आर्ची ठाण्यासह वर्धा व इतरही ठाण्यात फेक कॉल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

१,६६७ महिलांना देण्यात आले संरक्षण■ नवरा दारू पिऊन मारहाण करीत आहे. कुटुंबातील अन्य सदस्य शिवीगाळ करीत असल्याच्या अनेक तक्रारी डायल ११२ कडे येतात. अशा जवळपास विविध कारणांच्या मागील चार महिन्यांत १,६६७ महिलांना डायल ११२ ने संरक्षण दिले आहेत.

 

३१५ अपघातग्रस्तांना मिळाला दिलासाविविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात, अशातच डायल ११२ वर कॉल करून मदत मागितली जाते. मागील चार महिन्यांत डायल ११२ वर प्राप्त झालेल्या ३१५ कॉल्सला तत्काळ प्रतिसाद देत अपघातग्रस्तांना मदत पोहचवून त्यांना दिलासा दिला.१०.२१

डायल ११२ ही प्रणाली २४ बाय ७ सजग आहे. कॉल प्राप्त होताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचतात. फेक कॉल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. अनेक महत्त्वाचे गुन्हे रोखण्यात या यंत्रणेला यश आले आहे. कुणीही फेक कॉल करू नये. गंभीर घटना घडल्यास तत्काळ संपर्क करा, अवघ्या दहा मिनिटांत पोलिस मदत पोहचेल.- नुरुल हसन, जिल्हा पोलिस अधीक्षक.. 

टॅग्स :Policeपोलिसwardha-acवर्धा