शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन शस्त्रखरेदी कराल, तर पोलीस कोठडीची हवा खाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 23:47 IST

अनेकांनी चायनीज चाकूंचा वापर गुन्ह्यात केला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे असे आढळून आल्यास पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे. हे मात्र तितकेच खरे. शहरातील अनेक तरुण, युवक ‘भाईगिरी’च्या खुमखुमीत अडकले आहेत. वर्चस्ववादातून अनेक गंभीर घटना घडताना दिसून येत आहेत. त्यात वापरण्यात आलेले हत्यारं हे ऑनलाइन मागविण्यात आल्याचे पोलीस तपासात देखील उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हत्यारं बाळगे आणि बोलाविणे हा गुन्हा असला तरी अनेक तरुण विविध ऑनलाइन शॉपिंग साईट्सवरून बिनधास्तपणे शस्त्रखरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी चायनीज चाकूंचा वापर गुन्ह्यात केला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे असे आढळून आल्यास पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे. हे मात्र तितकेच खरे. शहरातील अनेक तरुण, युवक ‘भाईगिरी’च्या खुमखुमीत अडकले आहेत. वर्चस्ववादातून अनेक गंभीर घटना घडताना दिसून येत आहेत. त्यात वापरण्यात आलेले हत्यारं हे ऑनलाइन मागविण्यात आल्याचे पोलीस तपासात देखील उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलविभागाने ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर नजरा केंद्रित केल्या असून कारवाई करणार आहे.

ऑनलाइन शस्त्र खरेदी मोठे आव्हानn सध्या तरुण ऑनलाइन शस्त्र खरेदीकडे वळले आहे. विनादिक्कत अगदी सहजरित्या शस्त्र घरपोच मिळत असल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावत चालले आहे. त्यामुळे ऑनलाइन शस्त्र विक्री रोखणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. 

ऑनलाइन खरेदी करून गुन्ह्यात वापर शहरासह जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांत चायनीज शस्त्रांचा वापर गुन्हेगारांनी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून कारवाई करण्याची गरज आहे.

शस्त्रखरेदी, विक्री, बाळगणे हा गुन्हा n शस्त्र खरेदी करणे, त्याची विक्री करणे किंवा स्वत:जवळ बाळगणे हे कायद्याने गुन्हा आहे. असे करताना कुणी आढळून आल्यास त्याच्यावर शस्त्र अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली जाते.

ऑनलाइन खरेदीवर पोलिसांचे लक्ष - विविध ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. सायबर सेलमधील कर्मचाऱ्यांकडून अशा साईट्सवर वॉच ठेवला जातो आहे. शस्त्र खरेदी करताना आढळून आल्यास कारवाईसह कोठडीची हवा खावी लागणार आहे. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी