सिंचनात निष्काळजीपणा केल्यास माफी नाही
By Admin | Updated: November 3, 2015 02:42 IST2015-11-03T02:42:51+5:302015-11-03T02:42:51+5:30
बोरधरण तसेच डोंगरगाव धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचविण्यास कुचराई करणाऱ्या

सिंचनात निष्काळजीपणा केल्यास माफी नाही
वर्धा : बोरधरण तसेच डोंगरगाव धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचविण्यास कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. असा दम आ. डॉ. पंकज भोयर यांनी बोरधरण येथे आयोजित कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत दिला.
याप्रसंगी जि.प.सदस्य अरूण उरकांदे, कार्यकारी अभियंता ढवळे उपस्थित होते. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाटचऱ्याच्या अनेक तक्रारी आ. भोयर यांच्याकडे मांडल्या. यावर आमदारांनी अधिकाऱ्यांना खडसावत एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचा अहवाल सादर करून कोणत्या कामाला किती निधीची आवश्यकता आहे, त्याचा सादर सादर करण्याचे निर्देश दिले. सेलडोह येथील शेतकऱ्याने गत चार वर्षांपासून सायपन दुरूस्तीसाठी पाठपुरावा केल्याचे पुरावेच आमदारांना दिले तर हिंगणीचे अशोक मुडे यांनी अपुऱ्या मनुष्यबळामुळे सिंचनाच्या कामात अडथळे येत असल्याची बाब आमदारांच्या निदर्शनास आणून दिली.
केळझरचे धनंजय थुल, खडकीचे राजू लाडीस्कर, महाबळ्याचे अरूण ठोंबरे, मंडगावचे उपसरपंच राजेंद्र खाडे, तुळजापूरचे प्रमोद तमगिरे, घोराडचे विठ्ठल झाडे, अशोक तेलरांधे, हिंगणीचे सुरेंद्र पाटील बोरचे शालिक करपाते, हरि विचोरे, गेंदलाल अमनेरकर, मुकुंद गावंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मुख्यत: पाटबंधारे विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण, कामाचा निकृष्ट दर्जा, पाण्याचे योग्य नियोजन नसने, पाणी सोडल्यावर कालव्याची दुरूस्ती करणे, कर्मचारी मुख्यालयी नसणे, अशा समस्या मांडल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधतांना अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे, असे निर्देश यावेळी त्यांनी दिल्या.कालव्याचे काम चालू असताना ते जर निकृष्ट दर्जाचे होत असेल तर त्याबाबत ताबडतोब माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. यावेळी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)