शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

उत्पादित वस्तूंचा दर्जा सुधारल्यास व्यवसायाची वृद्धी होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:41 IST

रोपट्यापासूनच वटवृक्ष होते; तसे लहान व्यवसायापासूनच मोठा उद्योग उभा होतो. महिला सक्षमीकरणामध्ये बचत गटाची भूमिका महत्वाची आहे. बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचा दर्जा उच्चप्रतिचा असला तर मागणी वाढून त्यांच्या व्यवसायाचीही वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आमदार डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपंकज भोयर यांचा विश्वास : महिला व किशोरी मुलींकरिता स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : रोपट्यापासूनच वटवृक्ष होते; तसे लहान व्यवसायापासूनच मोठा उद्योग उभा होतो. महिला सक्षमीकरणामध्ये बचत गटाची भूमिका महत्वाची आहे. बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचा दर्जा उच्चप्रतिचा असला तर मागणी वाढून त्यांच्या व्यवसायाचीही वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आमदार डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.महिला व किशोरी मुलींना स्वयंरोजगारातून सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली अशोक कलोडे यांच्या कल्पकतेतून जि.प.महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने सेलू येथील पंचायत समितीच्या प्रांगणात स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संत सयाजी महाराज, जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली कलोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, उपसभापती सुनिता अडसड, नगराध्यक्ष शारदा माहुरे, जि.प. सदस्य विनोद लाखे, सुमित्रा मलघाम, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अशोक कलोडे व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी संत सयाजी महाराज म्हणाले, स्त्री ही आदिशक्ती आहे. स्त्रीमुळेच आपण या पृथ्वीतलावर आलो असून त्याचे कार्य हे महान आहे. तसेच महिलांनी चुल आधि मुल यापर्यंतच मर्यादीत न राहता खंबीरपणे उभे राहून रोजगार निर्मितीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन सभापती जयश्री खोडे यांनी केले. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी गुल्हाणे, अ‍ॅड. अनिता ठाकरे व शैलेश पांडे यांनी विविध मुद्दयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख संजय चौधरी यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यपालन अधिकारी इलमे यांनी मानले. यशस्वीतेकरिता गट विकास अधिकारी संजय पाटील, प्रकल्प अधिकारी एस.एम. सडमाके, विस्तार अधिकारी दादाराव राठोड, ज्योती सोनोने, मंगला राऊत, ज्योती धनवीज, माधुरी गणवीर, गौरव हजारे, मेश्राम, आंबटकर यांनी सहकार्य केले.लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटपमाझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये हमदापूर येथील तक्षा विनोद गायकवाड, श्रेया नितेश इरपाते, योगिनी प्रवीण पाटील, गौरी विनोद मांडवकर, पिंपळगांव येथील दुर्गा संजीव चांदोरे, पुणम उमेश केंडे, चांनकीच्या सान्वी प्रशांत भस्मे, वैष्णवी कमलाकर वाकुलकर तर वानोडा येथील पुजा उमेश लिचडे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयर