शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

आक्षेप ठरला 'कच्चा'; तर सहा महिने तुरुंगवास 'पक्का' ! व्हीव्हीपॅटवर आक्षेप घेताना सावधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 16:34 IST

Wardha : मतदार बंधूंनी आक्षेप घेताना सावधान ! अन्यथा ते अंगलट येण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : व्हीव्हीपॅट म्हणजे व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल. एखाद्या मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केले आहे, खरंच त्याच उमेदवाराला मत गेलं की नाही, याची खातरजमा करण्यासाठी मतदान केंद्रांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येतो; मात्र एखाद्या मतदाराने यावर आक्षेप घेतला आणि ते खोटे ठरले तर अशा मतदाराला सहा महिने कारावास आणि १ हजार रुपये दंडाची तरतूद निवडणूक आयोगाकडून होऊ शकते. त्यामुळे मतदार बंधूंनी आक्षेप घेताना सावधान ! अन्यथा ते अंगलट येण्याचा धोका नाकारता येत नाही.

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. त्यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांची निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हता वाढावी आणि ईव्हीएम मशीनबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनातील संशय दूर करण्यासाठी मतदाराने ईव्हीएम मशीनवर त्याच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरचं बटण दाबल्यानंतर त्याचे मत त्याच उमेदवाराला गेले की नाही याची पडताळणी करण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येतो. 

यात उमेदवाराच्या नावासमोरचं बटण दाबल्यानंतर त्याचवेळी उमेदवाराचे नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लिप मशीनमध्ये सात सेकंदापर्यंत मतदाराला दिसते. त्यानंतर आपोआप ती स्लीप कट होऊन बीप वाजतो आणि ती स्लीप सीलबंद पेटीत जमा होते; परंतु एखाद्या मतदाराला आपण ज्या उमेदवाराला मतदान केले, त्या उमेदवाराऐवजी वेगळ्याच उमेदवाराची चिठ्ठी मशीनमध्ये दिसली अशी शंका आल्यास असा मतदार आक्षेप घेऊ शकतो. आक्षेप खरा ठरला तर मतदान थांबविले जाते आणि जर आक्षेप खोटा ठरला तर त्या मतदारावर कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी सावध राहण्याची गरज आहे.

आक्षेप घेणाऱ्याचे दोनदा मतदान

  • एकदा मतदान केल्यानंतर मतदाराने आक्षेप घेतल्यास अशा मतदाराकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाईल. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा उमेदवाराला चाचणी मत नोंदविण्याची परवानगी देऊन सोबतच चिठ्ठयांचे सर्वांसमोर निरीक्षण केले जाणार आहे. 
  • अशावेळी आक्षेप खोटा आढळल्यास कलम ४९ एमए अंतर्गत अथवा मतदारांवर सहा महिने तुरुंगवास व एक हजार रुपये दंडाची तरतूद निवडणूक आयोगाने केलेली आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४wardha-acवर्धा