शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

कृषी केंद्र बदलले की भावही बदलतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 5:00 AM

प्रमुख बाजारपेठेत स्वत: ग्राहक म्हणून जाऊन खत, बियाने याच्या किंमतीमागचे गणित जाणून घेतले. दुकान बदलले की भाव बदलतात हा अनुभव शेतकऱ्यांप्रमाणेच लोकमतच्या प्रतिनिधीला आला. एकाच कंपनीच्या बियाणे व खताच्या किंमतीत असलेली तफावत व्यवसायातील स्पर्धा असली तरीही शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक असल्याचे शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देव्यवसायातील स्पर्धा जोमात : बियाणे,खते, किटकनाशकांच्या दरात जिल्ह्यातील गावा-गावात तफावत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आणि पावसाने हजेरी लावतच पेरणीला गती आली. जिल्ह्यात कृषी विभागाच्या लेखी १७ टक्केच पेरण्या झाल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र, ३० टक्क्यांवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात. त्यातच पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले. परिणामी शेतकरी पुन्हा बियाण्यांच्या खरेदीकरिता कृषी केंद्रात गर्दी करुन लागले. त्यातही बियाण्यांची कमतरता आणि पेरलेले बियाणे उगविले नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी केंद्रही बदलले. या सर्व घडामोडीचा आढावा घेण्यासाठी लोकमतने रविवारी वर्धा, सेलू, देवळी या प्रमुख बाजारपेठेत स्वत: ग्राहक म्हणून जाऊन खत, बियाने याच्या किंमतीमागचे गणित जाणून घेतले. दुकान बदलले की भाव बदलतात हा अनुभव शेतकऱ्यांप्रमाणेच लोकमतच्या प्रतिनिधीला आला. एकाच कंपनीच्या बियाणे व खताच्या किंमतीत असलेली तफावत व्यवसायातील स्पर्धा असली तरीही शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक असल्याचे शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.जिल्ह्यात यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कापशीच्या लागवडीत घट झाली असून सोयाबीनच्या क्षेत्रात ३२ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली असतानाच बाजारपेठेत या बियाण्यांचा तुटवडा आहे. पाऊस आणि बियाण्याच्या उगवण क्षमतेअभावी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बियाणे उगविलेच नसल्याच्या तक्रारी आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ९५ शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाण्याचे दगा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. कृषी केंद्रातील बियाणे उगविले नाही किंवा आता बियाणे शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांनी दुकान बदलविले.त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरात २०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतची तफावत दिसून आली आहे. वर्ध्यातील एका कृषी केंद्रातून ईगल एक्सलंट-प्लस या कंपनीच्या बियाण्याची एक बॅग २ हजार २५० रुपयात खरेदी केली असताना दुसºया दुकानात तीच बॅग २ हजार ४५० रुपयात देण्यात आली. सोयाबीन व कपाशीच्या बियाण्यांमध्ये एमआरपीच्या दरात १०० ते ५०० रुपयापेक्षा जास्त मार्जिन आहेत. सध्या बाजारपेठेत खताचा तुटवडा असल्याचे कृषीकेंद्र संचालक केवळ ५० ते १०० रुपयांपर्यंतची तफावत ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वात जास्त मार्जिन ही नामांकीत कंपनीच्या औषधामध्ये आहेत. एका औषधीची एमआरपी किंमत ३६०० रुपये असताना ती कृषी केंद्र चालकाला २४०० ते २६०० रुपयामध्ये मिळते. त्यामुळे कृषी केंद्र संचालक मधल्या कितीही किंमतीत शेतकºयाला विकतो. एकीकडे पेरलेलं उगवित नाही, शासन शेतमालाला योग्य भाव देत नाही, शासनाच्या सहमतीने कृषी केंद्र संचालकही शेतकºयांना लुटण्याचे काम करीत असल्याने शेतकºयाचा वाली तरी कोण? असा प्रश्नही शेतकºयांनी उपस्थित केला आहे.देवळीत भावबाजीत स्पर्धा, कृषी व्यावसायिकांनाही फटकादेवळी: तालुक्यामध्ये ९५ कृषी सेवा केंद्र असून त्यापैकी २५ कृषी सेवा केंद्र एकट्या देवळी शहरात आहे. तालुक्यामध्ये सोयाबीनच्या बियाण्यांबाबत काही तक्रारी असून इतर पिके मात्र तासी लागले असून डवरणी सुरु आहे. खत देण्याची लगबग असून बाजारात युरीया, सुफला, डिएपी व इतर खातांचा काही प्रमाणात तुटवडा आहेत. शहरातील सर्वच कृषी केंद्रामध्ये एमआरनी किंमतीपेक्षा कमी दरात बियाणे व खताची विक्री सुरु आहे. कृषी व्यावसायिकांमध्ये ग्राहक वाढविण्यासाठी भावाबाजीची स्पर्धा लागल्याने शेतकऱ्यांसह काही व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. काही कंपनीच्या कपाशी बियाण्याची बॅग एका दुकानात ६५० रुपयाला मिळत असताना इतर दुकानांमध्ये ७०० रुपयात मिळत आहे.यासोबतच त्याच दुकानात खताची बॅग १२०० रुपयाची असताना इतर दुकानांमध्ये १३५० रुपयांत विकल्या जात आहे. ग्रामीण भागामध्ये यापेक्षा जास्त दर आकारले जात आहे. तालुक्यातील १५० शेतकऱ्यांचे सोयाबीन उगविलेच नसल्याने फटका बसला आहे. कृषी दुकानदारांकडे मागील वर्षी शिल्लक राहिलेल्या बियाण्यांना कंपनीच्यावतीने पुन्हा रिपॅकींग करून बाजारात आणले जात असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जास्तीचे पैसे कमविण्यासाठी हा सर्व प्रकार होत असल्याने संबंधित बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचकडून संपूर्ण खर्च वसूल करावा, अशी मागणी होत आहे.बॅच नंबर, लॉट नंबरचा विसरकृषी केेंद्रातून बियाणे, रासायनिक खते किंवा औषधी विकत घेतल्यानंतर शेतकºयाला जीएसटी नंबर असलेले पक्के बिल देणे बंधनकारक आहे.पण, काही कृषी केंद्र संचालक जीएसटी नंबर नसलेले कच्चे बिल देऊन काम भागवित आहे. इतकेच नाही तर काहींच्या बिलावर बियाणे व खताचा बॅच नंबर व लॉट नंबर नसल्याचेही दिसून आले आहे. हा गैरप्रकाराचाच एक भाग असून कृषी विभागाची यासंदर्भात ‘हाताची घडी आणि तोंंडावर बोट’ अशीच भूमिका दिसून येत आहे.साठ्यासह, दरफलकही झाले गायबशेतकऱ्यांना कोणत्या बियाण्यांची किंमत किती आहे. तसेच बियाणे, खते आणि औषधींचा साठा कृषी केंद्रामध्ये किं ती आहे, याची माहिती देणारे फलक कृषी केंद्रात दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. परंतु, बोटोवर मोजण्या इतके कृषी केंद्र सोडले तर इतरांच्या कृषी केंद्रातील दरफलक गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी केंंद्रातील बियाण्यांचे दर माहिती होत नसल्याने त्यांना खिशाला झळ सोसावी लागत असल्याने दरफलक न लावणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :Marketबाजार