वैश्विक शांतीचा विचार हिंदीतूनच जगासमोर मांडावा लागेल
By Admin | Updated: January 12, 2016 02:02 IST2016-01-12T02:02:52+5:302016-01-12T02:02:52+5:30
सर्वांनाच हिंदी अस्मितेचा अभिमान असला पाहिजे. हिंदी ही केवळ पोटापाण्यासाठी न राहता अंतर्मनातून हिंदीवर प्रेम करावे लागेल.

वैश्विक शांतीचा विचार हिंदीतूनच जगासमोर मांडावा लागेल
गौतम बजाज : राष्ट्रभाषा प्रचार समितीत विश्व हिंदी दिवस
वर्धा : सर्वांनाच हिंदी अस्मितेचा अभिमान असला पाहिजे. हिंदी ही केवळ पोटापाण्यासाठी न राहता अंतर्मनातून हिंदीवर प्रेम करावे लागेल. सोबतच गांधी आणि विनोबांचे रचनात्मक कार्य ही हिंदीशी जोडावे लागेल. सोबतच वैश्विक शांतीचा विचारही हिंदीच्या माध्यमातूनच जगासमोर मांडावा लागेल, असे विचार परंमधाम आश्रम पवनारचे गौतमभाई बजाज यांनी व्यक्त केले. राष्ट्रभाषा प्रचार समिती येथे रामेश्वर दुबे सभागृहात आयोजित विश्व हिंदी दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समितीचे प्रधानमंत्री प्रा. अनंतराम त्रिपाठी, कोषाध्याक्ष नवरतन नाहर, प्रचारमंत्री हेमचंद्र वैद्य, परीक्षा मंत्री प्रकाश बाभळे आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी ते म्हणाले राज्यांमधील अंतर संबंध प्रस्थापित करण्यासाठी हिंदी ही एकमेव भाषा आहे. शासकीय अनास्थेमुळे आजची पिढी हिंदीपासून दूर चालली आहे. त्यामुळे विश्वस्तरावर हिंदीला सर्वाेच्च स्थान मिळवून देण्यासाठी जनमाणसात हिंदी रूजविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला काशीनाथ गावंडे, प्रा. हाशम शेख, अशोक शुक्ला, नाकाडे, लेंढे यासह समितीचे पदाधिकारी प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. संचालन डॉ. हेमचंद्र वैद्य तर आभार प्रकाश बाभळे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)