शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

‘आयकॉन्स’ समाजासाठी प्रेरक

By admin | Updated: June 10, 2017 01:21 IST

संघर्षातून यशाचे शिखर गाठणाऱ्या व मिळालेल्या यशाचा काही वाटा समाजासाठी राखून ठेवणाऱ्यांना पुरस्कृत करून इतरांना .....

सुधीर मुनगंटीवार : लोकमत कॉफीटेबल बुकचे थाटात प्रकाशन लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संघर्षातून यशाचे शिखर गाठणाऱ्या व मिळालेल्या यशाचा काही वाटा समाजासाठी राखून ठेवणाऱ्यांना पुरस्कृत करून इतरांना प्रेरणा देण्याचे काम ‘लोकमत’ने कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून केल्याचे गौरोद्गार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी येथे काढले. हॉटेल ग्रॅन्ड महेफिलमध्ये रंगलेल्या ‘लोकमत आयकॉन्स आॅफ अमरावती, यवतमाळ, वर्धा’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्याला ते विशेष पाहुण्याच्या भूमिकेतून संबोधित करीत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा, आमदार समीर कुणावार, आमदार वीरेंद्र जगताप तसेच लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, अमरावती युनिटचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे आणि संपादकीय प्रमुख गणेश देशमुख हे उपस्थित होते. तत्पूर्वी अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील आयकॉन्सचा समावेश असलेल्या ‘आयकॉन्स आॅफ अमरावती, यवतमाळ, वर्धा’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या शानदार कार्यक्रमाला ‘आयकॉन्स’, त्यांचे कुटुंबीय, तिन्ही जिल्ह्यांतील प्रतिष्ठित नागरिक आणि महत्त्वपूर्ण अधिकारी उपस्थित होते. जगाच्या पटलावर एकमेव भारतीय संस्कृती तग धरून आहे. ती टिकविण्यासाठी हजारोंचे परिश्रम कामी आले आहेत. ही एक निरंतर प्रक्रिया असल्याने यात स्वयंस्फूर्त योगदान देणाऱ्यांचे कौतुक व्हायलाच हवे, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आयकॉन्सच्या कर्तृत्वाची नोंद घेतली. आभाळाएवढे कार्य समाजासमोर- ना.रणजित पाटील समाजाच्या विविध क्षेत्रांत मुशफिरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे आभाळाएवढे काम समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत’ने ‘आयकॉन्स’ या ‘कॉफीटेबल बुक’ची संकल्पना आकारास आणली आहे. अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या तीन जिल्ह्यांतील अशा व्यक्तींचा शोध घेऊन प्रकाशित करण्यात आलेले हे ‘कॉफीटेबल बुक’ म्हणूनच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत गृहराज्यमंत्री पाटील यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ शिवाय पहाट नाही- ना.प्रवीण पोटे आॅयकॉन्स आॅफ अमरावती, यवतमाळ, वर्धा या ‘कॉफीटेबल’बुकचे कौतुक करताना ‘लोकमत’शिवाय पहाटच उजाडत नाही. ‘लोकमत’ने वाचकांच्या हृदयात केव्हाचीच जागा मिळविली आहे. त्यांनी निवडलेले ‘आयकॉन्स’ही समाजाला यशपथ दाखविणारे असल्याचे उद्गार पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी काढले. ‘लोकमत’साठीच नव्हे, देशासाठी महत्त्वाचा क्षण- विजय दर्डा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून जिद्दीने आणि पराक्रमाने ‘आयकॉन्स’ ठरलेल्यांचा हा गौरव सोहळा ‘लोकमत’साठीच नव्हे, तर राज्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचा क्षण आहे, अशा शब्दांत लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी अमरावती, वर्धा आणि यवतमाळमधील आयकॉन्सना शुभेच्छा दिल्यात. सन २०११ पासून ‘लोकमत’ने ‘आयकॉन्स कॉफीटेबल बुक’ची सुरूवात केली. यात बिझनेस आयकॉन्स, विमेन आयकॉन्स, एज्युकेशन आयकॉन्स अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववीरांची स्वतंत्र नोंद घेणारे कॉफीटेबल बुक्सचेही प्रकाशन केले गेले. प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जीं, रतन टाटा, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, स्मृती इरानी, अजय देवगन अशा अनेक दिग्गजांंनी कॉफीटेबल बुकच्या विविध प्रकाशन समारंभांना उपस्थिती दर्शविली. तोच धागा पुढे नेत अमरावती येथील प्रकाशन सोहळ्याला ना. सुधीर मुनगंटीवार, ना.प्रवीण पोटे, ना.रणजित पाटील हे मान्यवर उपस्थित असल्याचा आनंद विजय दर्डा यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’ केवळ पत्रकारितेपुरता मर्यादित नसून समाजपूरक उपक्रम राबविण्यास कटिबद्ध आहे. त्याच भावनेतून कर्तृत्ववीरांच्या कार्याची दखल ‘लोकमत’ने घेतली असल्याची भावना व्यक्त करून वाचकांच्या आशीवादाप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. रंगीबेरंगी प्रकाश किरणांनी न्हाऊन निघालेल्या, रेडकार्पेटने सुसज्ज अशा आलिशान दालनात आयोजित या शाही कार्यक्रमात ‘आयकॉन्स’ना कॉफीटेबल बुक व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी गणेश देशमुख, सुशांत दांडगे आणि विकास मिश्र यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन श्वेता शेगावकर, आभार प्रदर्शन यवतमाळ हॅलो हेड राजेश निस्ताने यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थित ‘आयकॉन्स’चे ग्रुप फोटोसेशनही करण्यात आले. या कार्यक्रमाला वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी उपस्थित होते. असा रंगला ‘आॅयकॉन्स’ सोहळा प्रशस्त हॉलच्या प्रवेशद्वारापासून अंथरलेले ‘रेड कार्पेट’ प्रकाशन समारंभाचे ‘खास’ पाहुणे असलेले आॅयकॉन्स, त्यांचे कुटुंबिय, मोमॅन्टो आणि कॉफी टेबल बुकसह ‘आयकॉन्स’नी केलेले फोटोसेशन आणि आॅयकॉन्सचे मान्यवरांनी केलेले गोड कौतुक, ही ‘या ‘ग्रँड’ कार्यक्रमाची वैशिष्ट्ये.’ सायंकाळी ७ च्या सुमारास या ‘ग्रँड’ कार्यक्रमाला सुरूवात झाली. अगदी प्रवेशद्वारावर आॅयकॉन्सचे तुतारीच्या निनादात स्वागत करून ‘आॅयकॉन्स’चे गुलाबपुष्प देऊन फोटोसेशन करण्यात आले. व्यासपिठाच्या अगदी समोर मान्यवर पाहुण्यांसह ‘आॅयकॉन्स’ची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या मागे त्यांचे कुटुंबीय व अन्य निमंत्रित स्थानापन्न झाले. ‘आॅयकॉन्स’नी परस्परांचा परिचयही करून