लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ३१ वर्षीय विवाहित महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ तिच्याच ओळखीतील महिलेने काढून त्यानंतर हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत दोघांनी पीडितेचे शारीरिक शोषण केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली. याप्रकरणात रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल होताच संबंधित महिला आणि एका व्यक्तीला अटक केली. तर एका व्यक्तीचा शोध पोलिस पथकाकडून घेतला जातो आहे.
पीडितेची मार्च २०२५ मध्ये मेहंदी लावण्याचे काम करणाऱ्या महिलेसोबत ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत महिला आरोपीने महिला ग्राहकांना मसाज करून दिल्यास तुम्हाला मोबदला दिला जाणार असल्याचे सांगत विश्वासात घेतले. पीडितेनेही कामाला होकार दिला. मसाज करून झाल्यावर पीडिता घरी जाण्यास निघत असताना तिला घरीच आंघोळ करण्यास सांगितले. पीडितेने आरोपी महिलेच्या घरात आंघोळ केली. मात्र, महिला आरोपीने आंघोळीचे व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला.
इतकेच नव्हे तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सांगितलेले काम करावे लागेल, असा दम दिला. पीडितेला तिने एका हॉटेलात नेले तेथे आरोपी कमल विश्वाणी आणि विक्रम चावरे दोघे आले त्यांनीही संबंधित व्हिडीओ पीडितेला दाखवून व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शोषण केले.
गरोदर झाल्याचा केला बनाव
पीडितेने वारंवार होणाऱ्या शोषणापासून वाचण्यासाठी गरोदर असल्याचा बनाव केला. मात्र, आरोपी ऐवढ्यावरच थांबले नसून त्यांनी पीडितेवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला तिला मारहाण केली. शिवाय पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. अखेर पीडितेला एका खासगी डॉक्टरने धीर देत पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. पीडितेने अखेर सर्व आपबीती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बुधवारपर्यंत आरोपींचा पोलिस कोठडीत मुक्काम
रामनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ गुन्हा दाखल करून एका पुरुषासह एका महिलेला अटक केली. तर एक व्यक्ती अद्यापही फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना बुधवार १७रोजीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
Web Summary : A married woman was blackmailed and sexually assaulted after a secretly recorded bathing video. Two arrested; search for another ongoing.
Web Summary : एक विवाहित महिला को नहाते समय गुप्त रूप से रिकॉर्ड किए गए वीडियो से ब्लैकमेल और यौन उत्पीड़न किया गया। दो गिरफ्तार; एक अन्य की तलाश जारी।