संकरीत तुरीचे प्रशिक्षण

By Admin | Updated: October 8, 2015 01:52 IST2015-10-08T01:52:54+5:302015-10-08T01:52:54+5:30

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्र्गत दहेगाव (गावंडे) येथे संकरीत तुरीबाबतचे प्रशिक्षण पार पडले.

Hybrid training | संकरीत तुरीचे प्रशिक्षण

संकरीत तुरीचे प्रशिक्षण

कीड नियंत्रणावरही मार्गादर्शन : समूहशेतीवर भर
वर्धा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्र्गत दहेगाव (गावंडे) येथे संकरीत तुरीबाबतचे प्रशिक्षण पार पडले.
वर्धा तालुक्यात संकरीत तूर आयसीपीएच २८४० या अधिक उत्पादन देणाऱ्या जातीचा ५२ हेक्टर क्षेत्रात १३० लाभार्र्थींना लाभ देण्यात आल्याचे प्रशिक्षणात उपविभागीय अधिकारी डॉ. उल्हास नाडे यांनी सांगितले. सदर प्रकल्पात शेतकऱ्यांना रायझोबियम, पीएसबी, ट्रायकोडर्मा, सल्फर, अ‍ॅझाडिरेक्टिन, बिव्हेरिया, मेटारायझिय, स्टिकी ट्रॅप, फेरोमन ट्रॅप, निमकेक, पोटॅशियम नायट्रेड या निविष्ठा देण्यात आल्या होत्या. या अंतर्गत प्रशिक्षण म्हणून कृषी शास्त्रज्ञ निलेश पाटकर यांनी तूर लागवड, बियाणे, बीज प्रक्रियेचे फायदे आणि वाणाची सखोल माहिती दिली. त्याचबरोबर तुरीवर येणारे विविध रोग व कीड तसेच तुरीवरील मर रोग, फुलोरा अवस्थेत येणारी कीड, शेंग पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, पिसारी पतंग आणि शेंग माशी याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली. त्याचबरोबर कृृषी विभागाद्वारे देण्यात आलेली आयसीपीएच २७४० या विषयीचीही माहिती व फायदे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
देवळी येथील गट तंत्रज्ञान व्यवस्थापक निरंजन वऱ्हाडे यांनी शेतकऱ्यांना समूह गट शेतीबद्दल माहिती दिली. तसेच गट स्थापन करणे, गटांमार्फत विविध प्रकल्प राबविणे, गटामार्फत एकत्रितरित्या शेतमाल उत्पादनाची खरेदी व विक्री करणे, गटांचे उत्पादन वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी स्वत: व गटामार्फत सुरू करण्याजोगे व्यवसाय तसेच स्थापन्यासाठी बँक कर्ज, आवश्यक कागदपत्रे, प्रकल्प अहवाल तयार करणे यासोबतच प्रकल्पाला बँकेकडून लागणारे आर्थिक सहाय्य मिळण्याकरिता मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी जावळेकर यांनी कृषी विभागांतर्र्गत येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन, ठिबक व तुषार सिंचन, विस्तार अंतर्गत राबविण्यात येणार प्रकल्प सधन कापूस, कडधान्य, गळीतधान्य, कडधान्य, मृदासंधारण, माती परीक्षण याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणाचे अध्यक्ष म्हणून दहेगाव येथील शेतकरी नवनीतलाल जावंधिया तर प्रशिक्षक म्हणून एम. ए. स्वामिनाथन फाऊंडेशनपचे येथील कृषी शास्त्रज्ञ नीलेश पाटकर, प्राप्ती वाटकर, मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक एम. बी. कापसे, सरपंच अर्चना कंगाले, कृषी मित्र, शेतकरी, पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद जोशी तर सपना निमजे यांनी केले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Hybrid training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.