शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

नवऱ्यानेच चिरला पत्नीचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 6:00 AM

पती-पत्नीत खटकेही उडायचे. घटनेच्या एक दिवसांपूर्वी संतोष व वैशाली यांच्यात क्षुल्लक कारणावरून खडाजंगी झाली. त्याचाच वचपा काढण्यासाठी संतोषने झोपेत असलेल्या वैशालीचा गळा धारदार शस्त्राने कापून तिची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.

ठळक मुद्देघरगुती कलह गेला विकोपाला

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरातील बालाजी मंदिर समोरील अशोकनगर भागात झोपेत असलेल्या पत्नीचा पतीनेच गळा चिरून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. वैशाली चाडगे (४०) असे मृतक महिलेचे नाव असून संतोष रामकृष्ण चाडगे, असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपी पतीच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, अशोकनगरातील चाडगे कुटुंबातील संतोष हा कुठलेही काम करीत नव्हता. याच कारणावरून त्यांच्या कुटुंबात नेहमीच वाद व्हायचे. शिवाय पती-पत्नीत खटकेही उडायचे. घटनेच्या एक दिवसांपूर्वी संतोष व वैशाली यांच्यात क्षुल्लक कारणावरून खडाजंगी झाली. त्याचाच वचपा काढण्यासाठी संतोषने झोपेत असलेल्या वैशालीचा गळा धारदार शस्त्राने कापून तिची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.सकाळी सदर घटना उघडकीस येताच घटनेची वार्ता परिसरात वाºयासारखी पसली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. मृतक वैशालीच्या घरी ब्युटी पार्लर असून तिला दोन मुल आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी त्यांच्या चमूसह घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. शिवाय मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता पाठविला. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. आरोपी संतोष चाडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.‘त्या’ घटनेला मिळाला उजाळागणेशोत्सवादरम्यान गत वर्षी ब्युटी पार्लर चालविणाºया भारती जांभूळकर हिची हत्या करण्यात आली होती. तर ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या वैशालीची आता हत्या झाल्याने त्या घटनेबाबतही घटनास्थळी चर्चा होत होती. एकूणच वैशालीच्या हत्येमुळे पुन्हा एकदा पुलगावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून त्या घटनेला उजाळा मिळाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :Murderखून