Husband chop off his wife's throat | नवऱ्यानेच चिरला पत्नीचा गळा
नवऱ्यानेच चिरला पत्नीचा गळा

ठळक मुद्देघरगुती कलह गेला विकोपाला

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शहरातील बालाजी मंदिर समोरील अशोकनगर भागात झोपेत असलेल्या पत्नीचा पतीनेच गळा चिरून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. वैशाली चाडगे (४०) असे मृतक महिलेचे नाव असून संतोष रामकृष्ण चाडगे, असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपी पतीच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अशोकनगरातील चाडगे कुटुंबातील संतोष हा कुठलेही काम करीत नव्हता. याच कारणावरून त्यांच्या कुटुंबात नेहमीच वाद व्हायचे. शिवाय पती-पत्नीत खटकेही उडायचे. घटनेच्या एक दिवसांपूर्वी संतोष व वैशाली यांच्यात क्षुल्लक कारणावरून खडाजंगी झाली. त्याचाच वचपा काढण्यासाठी संतोषने झोपेत असलेल्या वैशालीचा गळा धारदार शस्त्राने कापून तिची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
सकाळी सदर घटना उघडकीस येताच घटनेची वार्ता परिसरात वाºयासारखी पसली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. मृतक वैशालीच्या घरी ब्युटी पार्लर असून तिला दोन मुल आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी त्यांच्या चमूसह घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. शिवाय मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता पाठविला. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. आरोपी संतोष चाडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

‘त्या’ घटनेला मिळाला उजाळा
गणेशोत्सवादरम्यान गत वर्षी ब्युटी पार्लर चालविणाºया भारती जांभूळकर हिची हत्या करण्यात आली होती. तर ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या वैशालीची आता हत्या झाल्याने त्या घटनेबाबतही घटनास्थळी चर्चा होत होती. एकूणच वैशालीच्या हत्येमुळे पुन्हा एकदा पुलगावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून त्या घटनेला उजाळा मिळाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

Web Title: Husband chop off his wife's throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.