शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्याने पोलिसांच्या देखत पत्नीच्या तोंडात टाकले विष; आर्वी येथील घटनेने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 18:55 IST

आरोपी पतीस अटक

वर्धा : पतीच्या त्रासामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत, मुलाला घेण्यासाठी घरी गेलेल्या विवाहितेला विकृत पतीने शिवीगाळ करीत मारहाण करून, विषारी औषध पत्नीच्या तोंडात टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना आसोले ले-आउट परिसरात २४ रोजी घडली. काजल नीलेश टाके (२५) असे जखमी विवाहितेचे नाव असून, तिच्यावर आर्वी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजलला पती नीलेश याने मारहाण केल्याने, ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. आरोपी पतीने मुलाला सोबत नेऊ न दिल्याने काजलने पोलिसांना ही बाब सांगून मुलाला सोबत देण्याची विनंती तिने केली. दोन पोलीस कर्मचारी काजलसोबत तिच्या घरी मुलाला आणण्यासाठी गेले. काजलने मुलाला सोबत घेत, काही कपडे घेत असतानाच, संतापलेल्या नीलेशने काजलला पकडून मारहाण करणे सुरू केले, तसेच जबरदस्तीने तिच्या तोंडात विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

काजलने जोरजोरात आरडाओरड केली असता, घराबाहेर उभ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत, आरोपी नीलेश आणि काजलच्या मुलाला पोलीस ठाण्यात आणले, तसेच जखमी काजलला तत्काळ आर्वी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पोलिसांनी आरोपी नीलेशला अटक केली असून, जखमीवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकwardha-acवर्धा