चाकूच्या धाकावर पती-पत्नीस लुटले
By Admin | Updated: May 8, 2015 01:50 IST2015-05-08T01:50:58+5:302015-05-08T01:50:58+5:30
कन्नमवारग्राम येथील आचारी हे पत्नीसह जात असताना त्याला चाकूच्या धाकावर कन्नमवार घाटात हेटीकुंडी परिसरात लुटण्यात आले.

चाकूच्या धाकावर पती-पत्नीस लुटले
कारंजा (घाडगे): कन्नमवारग्राम येथील आचारी हे पत्नीसह जात असताना त्याला चाकूच्या धाकावर कन्नमवार घाटात हेटीकुंडी परिसरात लुटण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यातील आरोपी फरार आहे. यात १४ हजार रुपये रोख सोन्याचे दागिने व मोबाईल, असा एकूण २८ हजारांचा ऐवज लांबविला.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नमवारग्राम येथील राजू हुके व त्याची पत्नी मंदा हे दोघेही बुधवारी रात्री कन्नमवारग्राम येथे घरी परत जात होते. दरम्यान हेटीकुंडी येथील गोलू गजभिये व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी या दोघांना चाकूचा धाक दाखवून लुटले. यात राजूच्या खिश्यातील रोख १४ हजार रुपये दोन मोबाईल, व पत्नीच्या अंगावरील ५ गॅ्रमचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत १० हजार रुपये, असा एकूण २८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी राजू हुके यांनी कारंजा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरध्द भांदविच्या कलम ३९२(३४) नुसार गुन्हा नोंदविला असून तपास कारंजा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी करीत आहेत. वर्धा कारंजा मार्गावर रात्रीच्या वेळी याच परिसरात चोरी व लुटमारीच्या घटना सतत घडत आहेत.(शहर प्रतिनिधी)