शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:27 PM

महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यात सेवानिवृत्तीची मर्यादा पाच वर्षांनी कमी केल्याने वर्धा जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात आल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी दिली.

ठळक मुद्देदिलीप उटाणे : बोरगावच्या आयटक कार्यालयातील बैठक

आॅनलाईन लोकमतवर्धा : महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यात सेवानिवृत्तीची मर्यादा पाच वर्षांनी कमी केल्याने वर्धा जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात आल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा शाखेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष म्हणून मंगला इंगोले यांची उपस्थिती होती.राज्यात दोन लाख कर्मचारी शून्य ते ६ वयोगटातील मुले, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांना सेवा पुरवित आहेत. या योजनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शंभर रुपये मानधनापासून काम केले आहे. शासनाने अंगणवाडी कर्मचऱ्यांची सेवा भरती नियम तयार केले. यावेळी सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे ठेवले होते; परंतु अचानक फडणवीस सरकारने सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे केले. यामुळे राज्यातील ३२ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागेल. वर्धा जिल्ह्यातील शेकडो महिलांना घरी जावे लागेल.ज्या अंगणवाडी केंद्रात पाच ते दहा लाभार्थी आहेत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्यात येणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या पोषण आहारावर परिणाम होणार आहे.शासनाच्या चुकीच्या निर्णया विरोधात आयटक तिव्र लढा उभा करेल. शासनाने घेतलेला निर्णय त्वरीत मागे घेण्यासाठी मंगळवारी (२० फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा समोर धरणे आंदोलन करुन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रश्न व शासनाची भुमिका याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. प्रास्तविकातून जिल्हा सचिव वंदना कोळणकर यांनी सप्टेंबरच्या राज्यव्यापी संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृती समितींच्या नेत्यांसोबत चर्चा करून सेवाजेष्ठतेनुसार मानधन वाढ, भाऊबिज दोन हजार, सेवानिवृत्त लाभ दोन लाख देण्यात येईल असे जाहीर केले. परंतु अद्यापपर्यत शासनआदेश काढले नाही.बैठकीत ज्ञानेश्वरी डंभारे, प्रज्ञा ढाले, अर्चना वंजारी, वंदना खोबरागडे, मैना उईके, मनिषा सुरकार, शकुंतला शंभरकर, सुलभा तिरभाने, सुनिता टिपले, अल्का भानसे, शारदा कांबळे यांनी विचार व्यक्त केले. बैठकचे संचालन रंजनी पाटील यांनी केले तर आभार ज्योत्स्ना बोरकुटे यांनी मानले.१२८१ केंद्रात २५१८ सेविकाजिल्ह्यात एकूण १२८१ अंगणवाडी केंद्र आहे. या केंद्रात २५१८ महिला सेविका आहे. यात वर्धा १ मध्ये १२०, वर्धा २ मध्ये १५०, देवळी १५५, आर्वी १४४, आष्टी १०१, कारंजा १४१, सेलू १५३, समुद्रपुर १५४, हिंगणघाट १६३ अंगणवाडी आहेत.बचत गटाकडून आहार पुरविण्यास नकारबचत गटा कडून पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे पैसे १२ महिन्यापासून शासनाने दिले नाही. त्यामुळे बचत गट आहार पुरविण्यासाठी नकार देत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर आहार सुरू आहे. याची जबाबदारीही याच सेविकांवर आहे.