मानवी नैतिक मूल्यांची पेरणी स्काऊटच्या माध्यमातून
By Admin | Updated: December 21, 2014 23:04 IST2014-12-21T23:04:55+5:302014-12-21T23:04:55+5:30
माणूस दिसायला खूप सुंदर असतो, शरीराचे सौंदर्य ही निसर्गमय देणगी आहे; पण गुणवत्तेत सौंदर्य मिळविण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते़ गुणवत्तेचे सौंदर्य आपल्यापासून कुणीच

मानवी नैतिक मूल्यांची पेरणी स्काऊटच्या माध्यमातून
पुलगाव : माणूस दिसायला खूप सुंदर असतो, शरीराचे सौंदर्य ही निसर्गमय देणगी आहे; पण गुणवत्तेत सौंदर्य मिळविण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते़ गुणवत्तेचे सौंदर्य आपल्यापासून कुणीच हिरावू शकत नाही़ विद्यार्थी जगात नैतिक मूल्यांची पेरणी करून गुणवत्ता प्रदान करण्याचे काम लॉर्ड बेडन पॉवेल यांनी स्काऊट गाईडसच्या माध्यमातून केले, असे मत माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केले़
हिवरा येथे तीन दिवसीय जिल्हा स्काऊट गाईड मेळावा पार पडला़ मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यस्थानाहुन ते बोलत होते़ हिवरा येथील इंडीयन मिलीटरी स्कूलच्या प्रांगणात वर्धा जिल्हा स्काऊट गाईडचा ३१ वा मेळावा पार पडला़ लॉर्ड बेडन पॉवेल तसेच माता सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन होऊन मेळाव्याचे उद्घाटन जि़प़ अध्यक्ष चित्रा रणनवरे यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके तर अतिथी म्हणून जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, इंडीयन मिलीटरी स्कूलचे अध्यक्ष मनोज भेंडे, सचिव कृष्णा कडू, स्काऊटचे राज्य आयुक्त व्ही.एस. काळे, जि.प. सदस्य राणा रणनवरे उपस्थित होते़ जिल्ह्यातील २०० शाळांतील ११०० स्काऊट गाईडसचा मेळाव्यात सहभाग होता़ यात शेकोटी सांस्कृतिक कार्यक्रमात नगराध्यक्ष मनीष साहू, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ नारलवार उपस्थित होते. साहसखेळ प्रसंगी प्रा. शैलेजा सुदामे अतिथी म्हणून उपस्थित होत्या़
मेळाव्यात सहभागी स्काऊट वीरबालसह ध्वज, बॅँड पथकाच्या निनादात शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी पं.स. सदस्य मंगला इंगळे, सरपंच वहिदा शेख, सिस्टर विद्या जोसेफ अतिथी म्हणून उपस्थित होते. स्काऊटचे जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. शिरीष गोडे यांच्या मार्गदर्शनात इंडीयन मिलीटरी स्कूलचे प्राचार्य रविकिरण भोजने यांच्या सहकार्याने अत्यंत नियोजनबद्धरीत्या झालेल्या जिल्हा मेळाव्यास जिल्हा प्रमुख सतीश राऊत, जिल्हा आयुक्त चंद्रकांत वाढई, प्रकाश डाखोळे, वैशाली अवथळे, पर्यवेक्षक नितीन कोहे उपस्थित होते़ समारोप खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेत दारूगोळा भांडारचे बिगेडीयर ए.एच. शान, संस्थाध्यक्ष मनोज भेंडे, सचिव कृष्णा कडू, सारिका बांगडकर, शंकुतला चौधरी यांच्या आतिथ्यात झाला. प्रास्ताविक प्राचार्य रविकिरण भोजने यांनी केले. संचालन जिल्हा आयुक्त सुवर्णमाला थेरे व रेणुका भोयर यांनी केले़संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मी मराठी नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. स्काऊटचे राष्ट्रीय आयुक्त भाऊराव नगराळे यावेळी अतिथी म्हणून उपस्थित होते़ समारोपीय कार्यक्रमात स्काऊट गाईडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, मुख्याध्यापक, रोवर्स रेंजर्स व राष्ट्रपती पुरस्कार मिळविणारे स्वप्निल खोब्रागडे, दर्शन विलूरकर या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. इंडियन मिलीटरी शाळेच्या पथकाने सादर केलेला शिवाजी अफजलखान भेटीच्या पोवाड्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले़(तालुका प्रतिनिधी)