गौरव देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडी, बालवाडी विद्यार्थ्यांना प्रथिनेयुक्त आहार देण्याचा गाजावाजा करण्यात येत आहे. या योजनेतून मात्र बालकांची थट्टाच होत असल्याचा आरोप अंगणवाडी सेविका, मदतनीसांसह पालक करीत आहे. पोषण आहाराच्या नावावर केवळ ४ रुपये ९२ पैसे देण्यात येत आहे.महिला व बालकल्याण विभागामार्फत शालेय पोषण आहार पोहचविण्यात येते. पोषण आहाराकरिता एका विद्यार्थ्यांमागे ४ रुपये ९२ पैसे अनुदान देण्यात येते. सर्व खर्च संबंधित अंगणवाडी आहार बनविणाºया महिला किंवा बचत गटांकडे असतो. या योजनेत ५० टक्के केंद्र तर ५० टक्के राज्य सरकार अनुदान देते. या तोकड्या अनुदानात सर्व साहित्य, धान्य लागणारे इंधन आणि भाजीपाला, खरेदीसह अठवड्यातून काही दिवस व्हिटॅमीनयुक्त पदार्थ यात गुळ, शेंगदाणे लाडू, वडी, राजगिरा शिरा, उसळ आदींकरिता हे अनुदान दिले जाते. हे अनुदान एका चॉकलेटच्या किमतीचे असून यातून उष्मांक व प्रथिनेयुक्त पोषण आहार कसा घ्यावा, असा प्रश्न बचत गटांना व आहार बनविणाºया महिलांना पडला आहे. महागाईच्या काळात या एवढ्या तोडक्या रकमेत कसा पोषण आहार मिळणार असा सवाल असून यातून शासन एक प्रकारे विद्यार्थ्यांची थट्टाच करीत असल्याचा आरोप होत आहे.प्रत्येक दिवस कुठला आहार द्यावा याचा टाईमटेबल शासनाने दिला आहे. मुंग खिचडी, मसाले भात, शिरा, पोहा, सोजी, शेंगदाने लाडू, राजगिरा लाडू आदी देणे बंधनकारक आहे.मिळणाºया अनुदानात धान्य, भाजीपाला, तिखट, मीठ, तेल व इंधन खरेदीनंतर काय उरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अंगणवाडी पोषण आहार बनविण्यासाठी बचतगट, महिला मिळणे कठीण झाले आहे. नाईलाजाने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पोषण आहार शिजवावा लागत आहे. त्यातही महिला बालकल्याण अंगणवाडी सेविकांना सुपरवायझर बनविण्यास नकार देऊन विद्यार्थ्यांना आहार बंद करण्याची तंबी देत असल्याची माहिती आहे.अनुदान फार कमी आहे. आमच्या विभागामार्फत अनुदान वाढीसाठी पाठपुरावा सुरू आहे. अंगणवाडी मध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्यास बचत गटांना पोषण आहार द्यावे लागते. मात्र विद्यार्थी संख्या कमी असणाºया अंगणवाडीमध्ये बचत गट किंवा पोषण आहार बनविण्यासाठी महिला मिळत नसेल तर त्यास ठिकाणी अंगणवाडी सेविकांना पोषण आहार बनवावे लागते.- विवेक इलमे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, वर्धा
चॉकलेटच्या किमतीत अंगणवाडी पोषण आहार कसा देणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:17 IST
महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडी, बालवाडी विद्यार्थ्यांना प्रथिनेयुक्त आहार देण्याचा गाजावाजा करण्यात येत आहे.
चॉकलेटच्या किमतीत अंगणवाडी पोषण आहार कसा देणार ?
ठळक मुद्देअनुदान वाढीची मागणी : बचतगट, पोषण आहार शिजविणाºयांचा प्रश्न