शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

कसे शिकणार अ, आ, ई ?

By admin | Updated: May 31, 2014 00:05 IST

भारतीय राज्यघटनेप्रमाणे कुणीही कुठल्याही भाषेत शिक्षण घेऊ शकतो. कर्नाटक शासनाने मातृभाषेची सक्ती केल्याच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाने कुठलेच राज्य मातृभाषेची सक्ती शिक्षणासाठी करू शकत नाही,

मराठी भाषातज्ज्ञांनी व्यक्त केले मत : न्यायालयाचा आदेशही मान्यवर्धा  : भारतीय राज्यघटनेप्रमाणे कुणीही कुठल्याही भाषेत शिक्षण घेऊ शकतो. कर्नाटक शासनाने मातृभाषेची सक्ती केल्याच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाने कुठलेच राज्य मातृभाषेची सक्ती शिक्षणासाठी करू शकत नाही, असा निर्णय दिला. या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रात मराठीची सक्ती करता येणार नाही. भाषातज्ज्ञांनी न्यायालयाच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे तर काहींनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे भाषिक सूडबुद्धीला आळा बसेल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मराठी सक्तीची नसल्याने आता अ, आ, ई कसे शिकणार? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. भाषेच्या अस्तित्वावर विशेष परिणाम नाही मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचे सक्ती असावी; मात्र भाषा निवडीचे स्वातंत्र प्रत्येक व्यक्तीला असायला हवे.  न्यायालयाचा निर्णय तसा योग्य म्हणता येईल. कोणताही व्यक्ती देशाच्या कोणत्याही प्रांतात गेला तरी त्याला त्याच्या भाषेतून शिक्षण मिळायलाच हवे, या निर्णयामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वावर विशेष परिणाम  नाही.   सुनीता कावळे, ज्येष्ठ साहित्यिक.भाषेच्या संवर्धनाकरिता प्रोत्साहन देण्याची गरज न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. कारण हा निर्णय मानवतावादी भूमिकेतून घेण्यात आला. परप्रांतीयच नव्हे तर कोणालाच कोणत्याही राज्यभाषेची सक्ती नसावी. आपल्याकडे मातृभाषेतून शिक्षण हे हिन दर्जाचे असल्याचा गैरसमज आहे. शासनाने हा गैरसमज दूर करण्यासाठी भाषेचे संवर्धन करणार्‍यांना प्रोत्साहन द्यायला हवे. संजय इंगळे तिगावकर, कवी.तिसरी म्हणून प्रांतिक भाषा ठेवावी आपण ज्या राज्यात वास्तव्य करतो, तेथील भाषा अवगत करणे ही त्या व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. यातून व्यावहारिक सुलभता वाढेल, पण शिक्षणात भाषेची सक्ती नको, प्रत्येक व्यक्तीने त्या त्या प्रांतातील भाषा अवगत करण्याचं औदार्य दाखविल्यास राष्ट्रीय सलोखा निर्माण होईल. तिसरी भाषा म्हणून शिक्षणात प्रांतीक भाषेचा पर्याय ठेवल्यास वावगं ठरणार नाही.हरीश इथापे, नाटककार व दिग्दर्शकअधिकारापलीकडे सक्ती नको इंग्रजांनी भारतात ज्या शिक्षण पद्धतीची सुरूवात केली. त्यात त्रि भाषा सुत्र लागू केले. यात पहिली राष्ट्रभाषा दुसरी प्रशासकीय भाषा आणि तिसरी राजभाषा किंवा मातृभाषा असा उल्लेख होता. याचाच संविधानात अंगिकार करण्यात आला आहे. नागरिकांना या तीनही भाषेतून शिक्षण घेण्याचा अधिकार दिला गेला. मात्र या अधिकारापलीकडे जाऊन सक्ती करणे हे एक प्रकारे त्या व्यक्तीच्या अधिकारावर गदा आणण्यासारखे आहे. याला पर्याय नाही. मातृभाषेतून शिक्षण दिले जाणे हा एक योग्य संकेत ठरू शकतो. आणि मराठी भाषेला स्वतंत्र लिपी असल्याने तिच्या अस्तित्वाविषयी प्रश्नचिन्हच उद्भवत नाही. भाषा कशाकरिता शिकायची याचे जोवर आकलन होणार नाही तोवर भाषिक वाद कायम राहील. डॉ. सुभाष खंडारे, प्राचार्य व साहित्यिक.प्रत्येक राज्याने मातृभाषेचा शिक्षणात वापर करावा सध्या देशात भाषिक धोरण म्हणून तिसरी भाषा ऐच्छिक रूपात आहे. भाषा शिकण्याची मूभा विद्यार्थ्यांला असते. भारतीय संविधानात नमुद केले असले तरी राज्यनिहाय भाषिक धोरण राबविताना त्या प्रदेशाची भाषा शिक्षणामध्ये अनिवार्य असावी.  मातृभाषेत व्यक्त होण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे सक्तीने भाषा लादल्या तर विद्यार्थ्यांच्या भाषिक नाही तर शैक्षणिक विकासावरही वाईट परिणाम होऊ शकतो. भाषिक धोरण राबविताना प्रत्येक राज्याने आपापल्या मातृभाषेचा सर्वच स्तरावरील शिक्षणात राज्यभाषा म्हणून समावेश करावा.  जोपर्यंत शासन मराठी भाषेची सक्ती शैक्षणिक संस्थांकरिता करणार नाही. तोवर भाषिक धोरणाचा अवलंब योग्यरित्या होणे शक्य नाही. डॉ. किशोर सानप, माजी विदर्भ साहित्य संमेलनाध्यक्ष.