घराला आग; चार लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:11 IST2018-12-31T21:11:27+5:302018-12-31T21:11:41+5:30
तालुक्यातील कान्हापूर येथील बाबाराव मुजबैले या शेतकऱ्याच्या घराला आग लागली असून या आगीत चार लाखाच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

घराला आग; चार लाखांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुक्यातील कान्हापूर येथील बाबाराव मुजबैले या शेतकऱ्याच्या घराला आग लागली असून या आगीत चार लाखाच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मुजबैले यांच्या घराला आग लागल्याने घरातील कापूस, सोयाबीनसह घरगुती वापरातील साहित्याचीही राख झाल्याने त्यांचा परिवारा उघड्यावर आला आहे. घटनेची माहिती मिळताच सेलू तहसील कार्यालयाच्यावतीने पंचनामा करण्यात आला. आमदार डॉ.पंकज भोयर यांनाही या घटनेची माहिती मिळताच त्यांनी याबाबत सेलूच्या तहसिलदारांशी चर्चा करुन माहिती जाणून घेतली. घराला लागलेल्या या आगीत बाबाराव मुजबैले यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गावकºयांकडून करण्यात आली आहे.