अतिवृष्टीमुळे धोंडगावात घर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:03 PM2019-08-03T22:03:29+5:302019-08-03T22:03:49+5:30

तालुक्यातील धोंडगाव येथील शेतकरी गजानन थुटे यांचे घर सततच्या पावसादरम्यान कोसळले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. असे असले तरी माहिती देऊनही पंचनामा करण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

 The house collapsed due to heavy rains | अतिवृष्टीमुळे धोंडगावात घर कोसळले

अतिवृष्टीमुळे धोंडगावात घर कोसळले

googlenewsNext
ठळक मुद्देपंचनामा करण्यात दिरंगाई । नुकसानभरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील धोंडगाव येथील शेतकरी गजानन थुटे यांचे घर सततच्या पावसादरम्यान कोसळले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. असे असले तरी माहिती देऊनही पंचनामा करण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी आहे.
बुधवारी तालुक्यात २४ तासांत ११७.४७ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. त्या सर्व नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र, धोंडगाव येथील गजानन यादवराव थुटे यांचे घर कोसळून तीन दिवस उलटले तरी तहसील प्रशासनाकडून पंचनामा करण्यासाठी कोणीच फिरकले नाही.
तलाठी स्वप्नील देशमुख यांनी शनिवारी घटना स्थळ गाठून पाहणी केली. विशेष म्हणजे गजानन थुटे हे अल्पभूधारक शेतकरी आहे. त्यांच्याकडे दीड एकर शेती असून मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच त्यांना सहन करावा लागला आहे. तहसील प्रशासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गजानन थुटे यांनी केली आहे.

Web Title:  The house collapsed due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस