शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या गॅसगळतीमुळे घराला लागली आग; ३ शेळ्यांसह रोख अन् दागिने जळून कोळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 14:17 IST

पिपरी (खराबे) येथील दिनेश पंधरे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेत तीन शेळ्या, कापूस विक्रीतून मिळालेली रोख आणि दागिने जळून कोळसा झाला.

ठळक मुद्देपिपरी (खराबे) येथील घटना

वर्धा : घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तीन शेळ्या तसेच घरातील रोख आणि दागिने जळून कोळसा झाला. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

पिपरी (खराबे) येथील दिनेश पंधरे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेमुळे या कुटुंबावर संकटाचा डोंगरच कोसळला आहे. आगरगांव गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिपरी ( खराबे ) येथे नागरिकांची दिनचर्येतील कामे सुरळीत सुरू असताना घरात गॅस सिलिंडर लिक झाल्याने आग लागली. पाहता-पाहता आगीने संपूर्ण घर आपल्या कवेत घेतले.

आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. शिवाय अग्निशन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पण या आगीत दोन ते तीन दिवसांपूर्वी कापूस विक्री करून प्राप्त झालेली रोख रक्कम, घरात बांधून असलेल्या तीन शेळ्या, घरातील दागिने जळून खाक झाले.

खबरदारी घेण्याकडे विक्रेत्याचीही पाठच..

पुलगाव येथील ईशा इंडियन कंपनी या अधिकृत विक्रेत्याकडून पिपरी (खराबे) येथील दिनेश पंधरे यांनी नुकतेच गॅस सिलिंडर घेतले होते. गॅस सिलिंडरची विक्री करताना गॅस सिलिंडर लिक तर नाही ना याची शहानिशा विक्रेत्याकडून करणे क्रमप्राप्त आहे. पण सिलिंडर तपासा असे म्हटल्यावरही सर्वच बरोबर असल्याचे सांगून गॅस सिलिंडर पंधरे यांना देण्यात आले. पूर्वीच गॅस सिलिंडर लिक आहे काय याची शहानिशा करण्यात आली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असती अशी चर्चा घटनास्थळी होती.

टॅग्स :AccidentअपघातCylinderगॅस सिलेंडरfireआग