आमदारांकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी

By Admin | Updated: March 7, 2016 02:01 IST2016-03-07T02:01:09+5:302016-03-07T02:01:09+5:30

शनिवारी आलेल्या गारपिटीची पाहणी सकाळी १० वाजता आ. समीर कुणावार यांनी वणी या गावाला भेट देऊन केली.

Horticulture department surveyed by MLAs | आमदारांकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी

आमदारांकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी

हिंगणघाट : शनिवारी आलेल्या गारपिटीची पाहणी सकाळी १० वाजता आ. समीर कुणावार यांनी वणी या गावाला भेट देऊन केली. नुकसानग्रस्त गावकरी सिंधू चिडे, सुधीर कुमरे, आनंद गायकवाड, राजू नव्हाते, वसंता गावंडे, शांता धुर्वे, लक्ष्मण मडावी, राजू खांडरे, देवीदास खाडे, दिगंबर नव्हाते, भारत खाडे, उषा मुंगल, बावणे, फुसाटे, आश्वनी कहुरके यांच्या घराची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला.
यावेळी तहसीलदार दीपक करंडे, उपविभागीय कृषी अधिकारी मोरे, कृषी अधिकारी संजय साखरे, मंडळ अधिकारी चकोले, तलाठी भेदूरकर, ग्रामसेविका अर्चना तपासे, सरपंच सचीन वावरे, शरद सहारे, निलेश नव्हाते, ग्रा.प. सदस्य सुधाकर हेमके, जनाबाई नव्हाते, माजी सरपंच छाया करपे उपस्थित होते. वणी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेवून तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्तांना तातडीने २० किलो धान्य देण्याचे निर्देश करंडे यांनी दिले. येत्या तीन दिवसात सर्व पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देणार असल्याचे सांगितले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Horticulture department surveyed by MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.