पालकमंत्र्यांकडून कुणावार यांच्या कार्याचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:25 IST2018-03-09T00:25:41+5:302018-03-09T00:25:41+5:30
वित्त व वने मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी हिंगणघाटचे आ. समीर कुणावार यांच्या कार्याचा मुंबई येथे गुरुवारी सन्मान केला.

पालकमंत्र्यांकडून कुणावार यांच्या कार्याचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : वित्त व वने मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी हिंगणघाटचे आ. समीर कुणावार यांच्या कार्याचा मुंबई येथे गुरुवारी सन्मान केला. मुनगंटीवार यांच्या अनुपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक व्यवस्थित रित्या पार पाडल्याबद्दल पत्र देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होते, हे विशेष सदर पत्रामध्ये पालकमंत्र्यांनी सोपवलेली जबाबदारी पुढाकार घेवून पार पाडली. शिवाय तळगाळ्यातील सर्वसामान्य नागीिरकांकरिता दु:खाशी समरस होत आपण त्यांच्याशी निर्माण केलेले नाते हे आपल्या यशाचे गमक असून एक आदर्श आमदार असल्याचे उद्गार त्यांनी या प्रसंगी काढले.