कटंन्मेंट झोनमधील नागरिकांना घरपोच सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:00:22+5:30
सिंधी कॅम्प परिसरात आई आणि बाळ कोरोना बाधित असल्याने हा सर्व परिसर सील करण्यात आला आहे. लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तूची अडचण निर्माण झाली. उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी जवळपास ७० सामाजिक कार्यकर्ते नेमून त्यांच्याकडून सुविधा पुरविण्याचे नियोजन केले.

कटंन्मेंट झोनमधील नागरिकांना घरपोच सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : येथील सिधी कॅम्प परिसर कंटेन्मेंट झोन असल्याने जवळपास दोनशे घरे क्वारंटाईन आहेत. माणुसकीच्या नात्याने त्यांच्या सेवा सुविधांचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते सुनील आणि गोवर्धन कटियारी यांनी सर्व घरांना पुरेल असे सर्व भाजीपाल्याचे साहित्य नेमलेल्या समाजसेवकाकडून घरपोच वितरित केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिंधी कॅम्प परिसरात आई आणि बाळ कोरोना बाधित असल्याने हा सर्व परिसर सील करण्यात आला आहे. लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तूची अडचण निर्माण झाली. उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी जवळपास ७० सामाजिक कार्यकर्ते नेमून त्यांच्याकडून सुविधा पुरविण्याचे नियोजन केले.
या कंटेन्मेंट झोनमधील कुटुंबांकडील सिलिंडर संपले. त्यामुळे स्वयंपाकाचा प्रश्न निर्माण झाला. याबाबतची माहिती अॅड. दीपक मोटवानी यांनी प्रशासनाला दिली. लगेच रिकामे सिलेंडर गुरुनानक धर्मशाळेत जमा करण्यात आले आणि गरजू व्यक्तींना भरलेले सिलेंडर प्रशासनाने वितरित केल्याने मोठी अडचण दूर झाली.
या धर्मशाळेत प्राथमिक आरोग्य केंद्र रविवारीच तयार करण्यात आल्यामुळे परिसरातील लोकांची आरोग्याची मोठी अडचण दूर होऊन सुविधा उपलब्ध झाली.
सोमवारी जवळपास ३२ रुग्णांनी तपासणी केली आणि औषधीचे वितरण त्यांना करण्यात आले. या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. विशाल चव्हाण, आरोग्यसेविका मंदा राठोड, आरोग्यसेवक सुनील राठोड यांची ड्युटी लावण्यात आली आहे
परिसर सील केला असल्याने यातील लोकांना जाणे-येणे करणे करता येत नाही. त्यामुळे काही लोकांची पैशाचीही अडचण निर्माण झाली. कंटेन्मेंट झोन असल्याने बाहेर जाण्यास मज्जाव आहे. त्यामुळे काही दिवस त्यांना अडचण सहन करावी लागेल, असे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी सांगितले.