घरमूल्यानुसार निघणार घरटॅक्स
By Admin | Updated: November 20, 2014 22:56 IST2014-11-20T22:56:58+5:302014-11-20T22:56:58+5:30
बहुतांश ग्रामपंचायतमध्ये आतापर्यंत नवीन घराचा कर त्या घराचे चटईक्षेत्र मोजून आणि घराचा प्रकार लक्षात घेवून काढल्या जात होता. आता यापुढे हा कर घराची किंमत विचारात

घरमूल्यानुसार निघणार घरटॅक्स
कारंजा (घाडगे) : बहुतांश ग्रामपंचायतमध्ये आतापर्यंत नवीन घराचा कर त्या घराचे चटईक्षेत्र मोजून आणि घराचा प्रकार लक्षात घेवून काढल्या जात होता. आता यापुढे हा कर घराची किंमत विचारात घेवून काढण्यात येणार आहे. न्यायालयाने नुकतेच तसे आदेश पारित केले असल्याने घरमालकांला दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाल्याने कराची आकारणी सुद्धा तर्कशुद्धरित्या होईल, असे भाकीत करण्यात येत आहे. आता यापुढे ग्रामपंचायतला कर आकाराताना दुजाभाव करता येणार नाही. न्यायालयाचा आदेश महाराष्ट्रातील सर्वच ग्रा.पं.ला लागू राहणार आहे. ग्रामपंचायतीत घराच्या जागेनुसार कर आकरण्यात येत होता. यामुळे नागरिकांना अधिक कर भरावा लागत होता. ग्रामीण भागातील घराचे बांधकाम कमी व आवाराकरिता अधिक जागा असल्याचे दिसून आले आहे. यामुळे जागेनुसार येणारा कर अडचणीचा ठरत होता. हा कर भरताना त्यांची दमछाक होत होती. अशात न्यायालयाने काढलेल्या या नव्या आदेशामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असून बांधकामानुसार कर भरणे त्यांना सोपे जाणार आहे.(तालुका प्रतिनिधी)