शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

मागासवर्गीय आयोगांवरील नेमणुकीच्या अध्यादेशाची होळी

By admin | Published: January 11, 2017 12:56 AM

राज्य शासनाने अधिसूचना काढून ओबीसींच्या मागास आयोगावर अध्यक्षासह सदस्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

समता परिषदेची मागणी : नियमबाह्य नेमणुका तत्काळ रद्द करा वर्धा : राज्य शासनाने अधिसूचना काढून ओबीसींच्या मागास आयोगावर अध्यक्षासह सदस्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या सर्व नेमणुका मराठ्या धार्जिण्या आणि मराठा समर्थक असून मराठा समाजाला ओबीसीत घालण्याचा घाट शासनाचा असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या अध्यादेशाची होळी केली. तसेच निषेधाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोहोचविण्याकरिता ते जिल्हाधिकाऱ्यांच्या सूपृर्द केले. देशात भाजपा शासनाने केंद्रात व राज्यात हिटलरशाही पद्धतीने कारभार सुरू केलेला आहे. त्यांच्याकडून निवडणुकींपूर्वी केलेल्या घोषणांची पूर्तता होताना दिसत नाही. कोपर्डीच्या बलात्काराचे निमित्त करून मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने मोर्चे केल्याचे दाखविले. मराठा समाजाचा प्रतिकार म्हणून महाराष्ट्रात ओबीसी व बहुजनांचेही मोर्चे निघाले. त्यावेळी फडणवीस सरकारने ओबीसी मंत्रालयाची घोषणा करून एकीकडे ओबीसी व त्यांच्या लोकप्रतिनिधींना मंत्रालयाचे गाजर दिले, तर दुसरीकडे महाराष्ट्रात मराठ्यांच्या दबावाला बळी पडून त्यांना सरळ सरळ ओबीसी प्रवर्गातच टाकता यावे म्हणून, ओबीसींच्या मागासवर्गीय आयोगावर अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका करताना नियमांना डावलून मराठा धार्जिण्या सदस्यांच्या नेमणुका करून ओबीसींच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप समता परिषदेने निवेदनातून केला आहे.