शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:11+5:30

खासगी शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील तरतुदीच्या अधीन आहे. या नियमावलीतील अनुसूची ‘क’ मधील तरतुदीनुसार शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्यात येते. या नियमावलीतील तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचे अधिकार शासनाला आहे.

Holi of Education Commissioner's order | शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची होळी

शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची होळी

Next
ठळक मुद्देवेतनाऐवजी नियमबाह्यपणे प्रती विद्यार्थी अनुदानाबाबत स्थापन केला अभ्यासगट

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिक्षकांना वेतन अनुदानाऐवजी प्रती विद्यार्थी अनुदान द्या, नियमबाह्य विषयांसह अन्य ३३ विषयाबाबत शिक्षण आयुक्त पुणे यांनी ०४ डिसेंबरला नियमबाह्यपणे स्थापन केलेल्या अभ्यासगटाच्या आदेशाची होळी शनिवारी जिल्हा परिषद कार्यलयासमोर शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग कार्यालय मंत्री अजय भोयर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. शिवाय शिक्षण आयुक्तांचा हा आदेश रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिक्षण सचिवांना पाठविण्यात आले आहे.
खासगी शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील तरतुदीच्या अधीन आहे. या नियमावलीतील अनुसूची ‘क’ मधील तरतुदीनुसार शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्यात येते. या नियमावलीतील तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचे अधिकार शासनाला आहे. सदर नियमावलीतील तरतुदीशी विसंगत भूमिका प्रशासनाला स्विकारता येत नाही असे असताना ४ डिसेंबरला शिक्षण आयुक्तांनी शिक्षकांना वेतन अनुदानाऐवजी प्रती विद्यार्थी अनुदान देणे या विषयाबाबत अभ्यास गट नियमाबाह्यपणे स्थापन केला आहे. ही बाब घटनाबाह्य असल्याने शिक्षण क्षेत्रात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. तसेच शिक्षण आयुक्तांनी या सोबतच ३३ विषयांबाबत नियमाबाह्यपणे अभ्यासगट स्थापन केला आहे. ज्यामध्ये परिसरातील शाळांचे एकत्रिकरण करणे ज्यामुळे अनुदानीत शाळेतील गरीब विद्यार्थी शिक्षणांपासून वंचित राहु शकतो. या अभ्यास गटांमध्ये कोणत्याही शिक्षक संघटनेचा समावेश नसल्याने नियोजनबद्ध पद्धतीने मराठी शाळा संपविण्याचा घाट घातल्याचा आरोप निवेदनातून अजय भोयर यांनी केला आहे. शिक्षण आयुक्तांचे आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी करीत सदर आदेशाची होळी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.
आंदोलनात म.रा.शि.प. तक्रार निवारण समितीचे अनिल टोपले, मनोहर वाके, पुंडलिक रोठाड, पुंडलिक नागतोडे, धीरज समर्थ, उमेश खंडार, रहिम शहा, विलास बरडे, गजानन साबळे, सुनील गायकवाड, मिलिंद महल्ले, मोहन गाडे, संध्या देशमुख, अविनाश धात्रक, विनायक चांभारे, गणेश साळवे, उद्धव गाडेकर, नामदेव वनशिंगे, मुकेश इंगोले, दत्ता राऊळकर, विनय मुलतलवारे, किशोर उमाटे, प्रशांत चौधरी, राजेश मोहिते, पराग वाघ, प्रशांत दुधाने, गजानन कोरडे, अभिजीत जांभुळकर, स्वप्नील भगत, निलेश महल्ले, सुरेंद्र साळवे, मोहन गाडगे, संदीप चांभारे, किशोर ढेंगरे, अनिल जेऊघाले, सय्यद इजाज यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

कंत्राटी कामगारांची जिल्हाकचेरीवर धडक
वर्धा : येथील नगर परिषदेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे सध्या शोषण केले जात आहे. त्यांच्या विविध समस्या तातडीने निकाली काढण्यात याव्या, या मागणीसाठी शनिवारी संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्त्वात कंत्राटी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. कंत्राटी कामगारांच्या समस्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी तुषार उमाळे यांच्या नेतृत्त्वात मागील सात दिवसांपासून लढा दिल्या जात आहे. पण अद्याप कुठलाही निर्णय न घेण्यात आल्याने संतप्त कंत्राटी कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली. शिवाय विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. नगराध्यक्षांसह पालिकेतील अधिकारी कंत्राटी कामगारांच्या समस्या निकाली काढण्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनात मंगेश विधळे, अशोक वेले, राहुल बोबडे, मंगेश जगताप, राजू वानखडे, वैभव तळवेकर, रुपेश वाघमारे, कपिल गोडघाटे, अनुप उघडे, समीर खान, निलेश ठाकरे, प्रशिक बैले, गजानन सातव, वैभव कदम, बादल जोगे, अनिरुद्ध देशपांडे, गोपाल पर्बत, अनिकेत जाचक, अनिकेत रुद्रकार, राहुल गजभिये, अविनाश गोमासे, प्रतीक भालकर, प्रवीण कोल्हे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Holi of Education Commissioner's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.