हिंगणघाट-शिर्डी शिवशाही बस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:00 IST2017-12-10T00:59:56+5:302017-12-10T01:00:44+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागातील हिंगणघाट आगारात दाखल झालेल्या हिंगणघाट ते शिर्डी शिवशाही वातानुकुलीत बससेवेचा शनिवारी सकाळी हिंगणघाट बसस्थानकातून शुभारंभ करण्यात आला.

हिंगणघाट-शिर्डी शिवशाही बस सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागातील हिंगणघाट आगारात दाखल झालेल्या हिंगणघाट ते शिर्डी शिवशाही वातानुकुलीत बससेवेचा शनिवारी सकाळी हिंगणघाट बसस्थानकातून शुभारंभ करण्यात आला. जि.प अध्यक्ष नितीन मडावी यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सदर बस पुढील प्रवासाकरिता रवाना झाली.
हिंगणघाट बसस्थानकावर पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रा. किरण वैद्य, विभागीय वाहतूक अधिकारी सुतवणे, आगार व्यवस्थापक घुसे, बस स्थानक प्रमुख मसराम, नागोसे, एसटी कामगार संघटनेचे सचिव हितेंद्र हेमके, कास्ट्राईब संघटनेचे मांडवे, डाखोरे, याची प्रमुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी सदर वातानुकूलीत बसचे पूजन करीत वाहक व चालकाचा सत्कार केला. हिंगणघाटवरून ही शिवशाही वातानुकूलीत बस दर दिवशी सकाळी ८.२० वाजता निघणार आहे. ती शिर्डीला ११ वाजता पोहोचेल. हेच वेळापत्रक शिर्डी हिंगणघाट बसचे राहणार आहे. या बसचा वर्धा, पुलगाव, अमरावती, अकोला, चिखली, जालना व औरंगाबाद या सात गावी थांबा राहणार आहे. सदर बस संपूर्ण वातानुकूलीत असून त्यात एलसीडी स्क्रीन, फायर डिटेक्टींग सिस्टीम, मोबाईल चार्जर, वायफायची सुविधा असून सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रापमच्या सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन करताना बसस्थानक प्रमुख मसराम सांगितले. संचालन हेमके यांनी केले. यावेळी हिंगणघाट आगारातील चालक व वाहक उपस्थित होते.