हिंगणघाट व समुद्रपूर बाजार समिती पुन्हा राकाँ गटाच्या ताब्यात

By Admin | Updated: October 10, 2016 00:49 IST2016-10-10T00:49:02+5:302016-10-10T00:49:02+5:30

हिंगणघाट व समुद्रपूर कृषी उत्पन्न वाजार समितीची निवडणूक चुरशीची होईल, असे चित्र असताना दोन्ही

Hinganghat and Samudrapur Bazar Samiti resumed by Rakha group | हिंगणघाट व समुद्रपूर बाजार समिती पुन्हा राकाँ गटाच्या ताब्यात

हिंगणघाट व समुद्रपूर बाजार समिती पुन्हा राकाँ गटाच्या ताब्यात

भाजपा गटाला दोनच जागा : सुधीर कोठारी यांना निर्विवाद यश
वर्धा : हिंगणघाट व समुद्रपूर कृषी उत्पन्न वाजार समितीची निवडणूक चुरशीची होईल, असे चित्र असताना दोन्ही बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना व काँग्रेस गटाने एकत्र येत पुन्हा सत्ता काबीज केली. हिंगणघाट बाजार समितीत या गटाने एकतर्फी विजय संपादीत करीत सर्व १८ ही जागा बळकावल्या. भाजपा व सेनेच्या गटाला खातेही उघडता आले नाही. समुद्रपूर बाजार समितीत १८ पैकी १६ जागांवर गटाने विजय संपादीत केला. भाजपा गटाला दोनच जागा मिळाल्या. दोनही बाजार समितीत अ‍ॅड. सुधीर कोठारी यांना सर्वाधिक ६२७ मते मिळाली. अ‍ॅड. कोठारी हे पाचव्यांदा संचालक म्हणून निवडून आले. दरम्यान तीनदा सभापतिपद भुषविले.

हिंगणघाट बाजार समितीतील विजयी उमेदवार

४सहकारी सोसायटी मतदार संघ - अशोक उपासे (४९६), अ‍ॅड. सुधीर कोठारी (६२७), मधुकर डंभारे (५४१,) उत्तम भोयर (४९५), बापुराव महाजन (४७१), शेषराव येरलेकर (५२६), सुरेश सातोकर (५०१)
४महिला राखीव गट - माधुरी चंदनखेडे (५९१), सुरेखा सायंकार (५६३)
४इतर मागासवर्गीय गट - हरिष वडतकर (५५५), बळीराम नासर (५६१)
४ग्रामपंचायत मतदार गट - राजेश मंगेकर (३१८), मधुसूदन हरणे (३१३), सुरेश वैद्य (३०९), विनोद वानखेडे (३१२), अडते मतदार गट - पंकज कोचर (३०८), ओमप्रकाश डालीया (२९५) तर हमाल मापारी गटातून - संजय कातरे (१८७)

समुद्रपूर बाजार समितीतील विजयी उमेदवार
४सहकारी सोसायटी मतदार संघ - हिम्मत चतुर (३४८), जीवन गुरनुले (३०१), गंगाधर हिवंज (३०५,) शरद कारमोरे (३०४), वसंता महाजन (३२०), मनीष निखाडे (३००), अशोक वांदिले (२७२).
४महिला राखीव गट - रेखा जोगने (२९८), ललीता गुळघाणे (३०१)
४इतर मागासवर्गीय गट - महेश झोटींग (२८० ), जनार्दन हुलके (३०९)
४ग्रामपंचायत मतदार गट -भारत वैरागडे (१९०), उल्हास कोटमकर (२४१), संजय तुराळे (२१३), आशा भगत (२१०), व्यापारी अडते मतदार गट - अभय कोठारी (५१), पिंटू बादले (६१), हमाल मापारी गट - भोजराज दळने (२९).

Web Title: Hinganghat and Samudrapur Bazar Samiti resumed by Rakha group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.