हिंगणघाट व आष्टीत दीपोत्सवाचे थाटात प्रकाशन

By Admin | Updated: November 8, 2015 02:09 IST2015-11-08T02:09:35+5:302015-11-08T02:09:35+5:30

वर्षभरापासून प्रतीक्षा असलेल्या व मराठी मनाचा सन्मान असलेल्या लोकमत दीपोत्सव २०१५ या अंकाचे लोकार्पण तालुका लोकमत कार्यालयात शनिवारी थाटात पार पडले.

Hinganghat and Ashtavit, the festival publication of the festival | हिंगणघाट व आष्टीत दीपोत्सवाचे थाटात प्रकाशन

हिंगणघाट व आष्टीत दीपोत्सवाचे थाटात प्रकाशन

अंक दर्जेदार असल्याची पावती : वाचकांसाठी मनोरंजन व साहित्याची पर्वणी
हिंगणघाट : वर्षभरापासून प्रतीक्षा असलेल्या व मराठी मनाचा सन्मान असलेल्या लोकमत दीपोत्सव २०१५ या अंकाचे लोकार्पण तालुका लोकमत कार्यालयात शनिवारी थाटात पार पडले.
सोहळयाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ पटवारी संघाचे वर्धा जिल्हा सचिव श्याम चंदनखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अशोक गव्हाळे, पटवारी संघाचे उपविभाग शाखाध्यक्ष संजय भोंग, सदस्य श्रीकांत राऊत, वर्धा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे उपाध्यक्ष संजय शिंदे, हिंगणघाट वृत्तपत्र विके्रता संघाचे अध्यक्ष प्रशांत ढेंगळे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी लोकमत दीपोत्सवातून दर्जेदार साहित्याची मेजवानी दरवर्षी मिळत असून यंदाही ती मिळणार असल्याचे प्रतिपादन केले. श्याम चंदनखेडे यावेळी म्हणाले, लोकमत दीपोत्सव २०१५ चा अंक मराठीचा सन्मान वाढविणारा आहे. यातील माहिती, लेख, ज्ञान वाढविणारे आहे. अशोक गव्हाळे यांनी लोकमत च्या नवनवीन कल्पना व्यावसायिक लाभ देणाऱ्या असून दीपोत्सव हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले. लोकमत दिपोत्सव २०१५ चा अंक अत्यंत ज्ञानवर्धक मनोरंजनात्मक आणि साहित्याची पर्वणी ठरणारा असल्याचेही मान्यवरांनी सांगितले. आहे. अंकाकरिता ज्यांचे अमुल्य योगदान लाभले त्या सर्वांना विदर्भ पटवारी संघाने शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला गोपाल पिसे, तुकाराम राऊत, मधुकर वझेकर, विनोद मेघरे, चेतन लाजुरकर, अविनाश राऊत उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन करीत तालुका प्रतिनिधी भास्कर कलोडे यांनी सर्वांचे आभार मानले.(तालुका प्रतिनिधी)
सामाजिक बांधिलकी जोपासणारा अंक
आष्टी : लोकमत वृत्तपत्र समुहाने काढलेला दीपोत्सव २०१५ हा अंक सामाजिक बांधिलकी जोपासणारा असून वाचकांना दिशा देण्याचे काम करेल, असे प्रतिपादन मान्यवरांनी लोकमत दीपोत्सव प्रकाशन कार्यक्रमात केले.
आष्टी येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात अतिथींच्या हस्ते दीपोत्सवाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरचे सदस्य प्रा. अरूण बाजारे तर प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. परिहार, हुतात्मा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी.यु. झाडे उपस्थित होते. प्रारंभी दीपोत्सवाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. बाजारे म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर वृत्तपत्रांतून न्यायाची पूर्तता झाली. लोकमत वृत्तपत्र मराठीतून असल्यामुळे समुहसंघटनास बळकटी मिळाली. लोकमतचे सर्व उपक्रम सामाजिक बांधिलकी जोपासणारे आहे. नव्याने आलेला दीपोत्सव परिवर्तनाला गती देणारा आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी परिहार म्हणआले, हा दीपोत्सव युवा वर्गाला अत्यंत उपयुक्त असा आहे. प्रत्येक युवकाने तो हाताळावा असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य झाडे यांनी लोकमत दीपोत्सवासारखे विशेषांक फारच कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार लोकमत प्रतिनिधी अमोल सोटे केले.(प्रतिनिधी)

Web Title: Hinganghat and Ashtavit, the festival publication of the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.