शरद देशमुख यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
By Admin | Updated: August 24, 2016 00:30 IST2016-08-24T00:30:59+5:302016-08-24T00:30:59+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती शरद देशमुख यांच्यावर संचालक मंडळाने अविश्वास ठराव आणला होता. या ठरावावर कारवाई करीत

शरद देशमुख यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
उपनिबंधकांच्या आदेशावर स्थगनादेश
वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती शरद देशमुख यांच्यावर संचालक मंडळाने अविश्वास ठराव आणला होता. या ठरावावर कारवाई करीत उपनिबंधकांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता न्यायालयाने उपनिबंधकांच्या आदेशावर तात्पुरता स्थगनादेश दिला आहे.
शरद देशमुख वर्धा बाजार समितीचे सभापती असताना त्यांच्यावर सभासदांनी १६ विरूद्ध दोन मतांनी पारीत झाला केला. या ठरावाला उपनिबंधक वर्धा यांनीही मान्यता देऊन आदेश काढला. यामुळे त्यांना पायऊतार व्हावे लागले. शिवाय त्यांना सभापती पदालाही मुकावे लागले होते. शरद देशमुख यांनी या आदेशाविरोधात संचालक, सहकार खात्याकडे आव्हान दिले. त्यांनी कुठलाही विचार न करता सदर बाब आपल्या अधिकारक्षेत्रात येत नाही असे म्हणत तो दावा नाकारला. या आदेशाविरोधात देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने लगेचच त्या आदेशाला तात्पुरता स्थगनादेश दिला आहे. त्यामुळे शरद देशमुख यांचे सदस्यत्व हे सध्या अबाधित आहे. शरद देशमुख यांच्या वतीने अॅड. मुकेश समर्थ यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)