शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अहो! मी जिवंत आहे; मयत दाखवून डावलला पीएम किसान योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2023 21:17 IST

Wardha News शासकीय काम बारा महिने थांब याची प्रचिती अनेकदा अनेकांना येते; पण जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवून चक्क पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावात उघडकीस आला आहे.

वर्धा : शासकीय काम बारा महिने थांब याची प्रचिती अनेकदा अनेकांना येते; पण जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवून चक्क पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावात उघडकीस आला आहे. संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे तीन हप्ते जमा झाले; पण त्यानंतर शासकीय मदत का मिळाली नाही याची विचारणा करण्यासाठी शेतकरी संबंधिताकडे गेला असता तुमचा तर मृत्यू झाला. त्यामुळेच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ बंद करण्यात आल्याचे त्याला सांगण्यात आले. अहो! मी अजूनही जिवंत आहे, हे पटवून देण्यासाठी आता या शेतकऱ्याला शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आपल्याला पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी हवालदिल शेतकरी रामसिंग हिरासिंग गहेरवार यांनी केली आहे.

गहेरवार यांच्याकडे वडिलोपार्जित १.११ हे.आर. शेतजमीन

दारोडा येथील शेतकरी रामसिंग हिरासिंग गहेरवार यांची शेतजमीन दारोडा शिवारात असून ते याच वडिलोपार्जित शेतजमीन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना ९ मार्च २०२० ला पीएम किसान योजनेचा पहिला, १५ एप्रिल २०२० ला दुसरा तर ९ ऑगस्ट २०२० ला तिसरा हप्ता मिळाला; पण मयत दर्शवित त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देणे बंद करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित संबंधिताला विचारणा केल्यावर आपल्याला जिवंतपणीच मृत घोषित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली.

तहसीलदारांनीही उडविली थट्टा

संबंधित गंभीर बाब शेतकरी गहरवार यांच्या लक्षात येताच त्यांनी हिंगणघाट येथील तहसील कार्यालय गाठून त्याबाबतची माहिती तहसीलदारांना दिली; पण तहसीलदारांनीही उडवाउडवीचे उत्तर दिल्याने हवालदील शेतकरी रामसिंग गहरवार यांनी आ. समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयाची पायरी चढली. आमदारांना आपबीती सांगितली. तेव्हा तू काळजी करू नकोस, तू तहसीलदाराकडे पुन्हा जा, तुझे काम होईल, असे सांगितल्याने शेतकरी पुन्हा तहसीलदारांकडे आला. तेव्हा, तू आमदार साहेबांकडून आला. तेव्हा तू जिवंत होताच, काळजी करू नको, असे म्हणत तहसीलदारांनी हवालदील शेतकऱ्याची थट्टाच केली. तालुका कचेरी ते आमदार आणि पुन्हा तालुका कचेरी अशी पायपीट करूनही समस्या निकाली निघाली नसल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocialसामाजिक