ज्येष्ठांच्या आनंदी कट्टयात रंगली हसरी मैफल
By Admin | Updated: October 31, 2015 02:58 IST2015-10-31T02:58:45+5:302015-10-31T02:58:45+5:30
येथील अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे हास्य कवी डॉ. राजा धर्माधिकारी यांचा वऱ्हाडी काव्यगीतांचा कार्यक्रम ‘हसरी मैफल’ पार पडला.

ज्येष्ठांच्या आनंदी कट्टयात रंगली हसरी मैफल
काव्यगीतांचा कार्यक्रम : ज्येष्ठ नागरिकांना केले सन्मानित
वर्धा : येथील अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे हास्य कवी डॉ. राजा धर्माधिकारी यांचा वऱ्हाडी काव्यगीतांचा कार्यक्रम ‘हसरी मैफल’ पार पडला. खास ज्येष्ठ नागरिकांकरिता असलेल्या या कार्यक्रमात जीवनातील दु:खे विसरायला लावत खळखळून हसवले.
समाजजीवन तसेच कौटुंबिक जीवन दु:खी, कष्टी व नैराश्यमय झाले आहे. हास्य फुलवूनच या दु:खाची तीव्रता अंशत: का होईना पण कमी करता येईल, असे मत डॉ. राजा धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले. ज्येष्ठांसाठी असलेल्या आनंदीकट्टा या उपक्रमात त्यांच्या सादरीकरणाच्या खास शैलीने वऱ्हाडी काव्यगीतातून उपस्थितांना निखळ आनंद घेता आला. हास्य काव्यातील आनंद घेत असतानांच त्यांनी उपस्थितांसमोर सामाजिक समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मानवी मूल्य आणि देशभक्तीचे बीज रुजविले. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी कलेचे प्रस्तुतीकरण केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मोहन अग्रवाल, डी.वाय.एस.पी. संतोष वानखेडे, अरुणकुमार चवडे, मैत्री संस्थेचे घुसे उपस्थित होते. संगीत अॅकेडमीच्या बालगायिकांनी जय शारदे वागेश्वरी या गीताने मैफलीला प्रारंभ केला. यावेळी शांता पावडे, संतोष वानखेडे यांचआ मान्यवरांनी स्मृतिचिन्ह देवून सत्कार केला. यावेळी निवृत्त पोलीस निरीक्षक पाटील, गायक दीपक मेने यांनी गीते सादर करुन रसिकांचे मनोरंजन केले.
यानंतर बालगायक अवंती ढुमणे हिने भावगीते, नाट्यगीते सादर केले. संचालनाची साथ अश्विनी कबाडे हिने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन आयोजक संध्या देशमुख यांनी केले. यानंतर सुरस गीत सादर केले. कलावंताना हार्मोनियमवर शैलेश जगताप, तबला अजय गलांडे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विलास ढुमणे, महेश कबाडे, शेखर देशमुख, अजय गलांडे, ज्योती गाठीबांधे, मैथीली खटी, शांता पावडे, घुसे, ज्योती भगत आदींनी सहकार्य केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)