हेमाडपंथी रूद्रेश्वर मंदिरात यात्रा महोत्सवाला प्रारंभ

By Admin | Updated: February 21, 2017 01:14 IST2017-02-21T01:14:45+5:302017-02-21T01:14:45+5:30

श्री श्रेत्र कोटेश्वर देवस्थान (रोहणी) येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा आहे. कोटेश्वर देवस्थानतर्फे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे.

Hemadpanthi started the journey of the Rudreshwar temple | हेमाडपंथी रूद्रेश्वर मंदिरात यात्रा महोत्सवाला प्रारंभ

हेमाडपंथी रूद्रेश्वर मंदिरात यात्रा महोत्सवाला प्रारंभ

महाशिवरात्रीचे औचित्य : १५ दिवस चालणार यात्रा
कोटेश्वर देवस्थानात महाशिवरात्री यात्रा
विजयगोपाल - श्री श्रेत्र कोटेश्वर देवस्थान (रोहणी) येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा आहे. कोटेश्वर देवस्थानतर्फे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. विदर्भातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कोटेश्वर देवस्थानात दरवर्षी यात्रा भरते. परंपरेनुसार यंदाही २४ ते २७ फेबु्रवारीदरम्यान यात्रा महोत्सव आयोजित आहे. या यात्रेत अनेक व्यापारी दुकाने थाटतात. यंदा यात्रेतील आकाश पाळणा, मौत का कुआ हे आकर्षण ठरणार आहे. १४ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वाजता ट्रस्टचे सचिव विरेंद्र देशपांडे व अध्यक्ष चंद्रशेखर येरावार यांच्या हस्ते घटस्थापना झाली. २४ रोजी सकाळी ६ ते ७.३० रुद्राभिषेक व पुजा आरती, ११ ते १.३० बालकीर्तनकार भाविका खंडारकर नागपूर यांचे कीर्तन, दुपारी २ ते ५ विष्णू हांडे महाराज व संच हिंगोली यांचे भारुड, ५ वाजता श्री गुरुदेव सेवा मंडळ विजयगोपाल यांची भजनसंध्या आहे. २५ रोजी दुपारी ३ ते ५ संत ज्ञानेश्वरी वारकरी भजनी मंडळ विजयगोपाल यांचे भजन, २६ रोजी दुपारी पद्मावती महिला भजन मंडळ रोहणी यांचे भजन, रात्री सुरेंद्र महाराज मुळे देवळी यांचे कृष्णजन्म कीर्तन तर २७ रोजी दहिहांडी, गोपाल काला, मुळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन व पालखीची शोभायात्रा निघणार आहे.(वार्ताहर)

पोहणा (पिपरी) : येथील प्रसिद्ध हेमाडपंथी रूद्रेश्वर मंदिरात २४ फेब्रुवारीपासून यात्रा महोत्सवास प्रारंभ होत आहे. १५ दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवामध्ये यात्रेनिमित्त चित्रपटगृहे, मुलांसाठी विविध प्रकारची मनोरंजन केंद्रे, विविध प्रकारच्या वस्तुंची दुकाने याशिवाय इतर दुकानांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे.
विदर्भात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत वर्धा जिल्हा वासीयांव्यतिरिक्त यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील भाविक मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या पोहणा येथे हेमाडपंथी शिवमंदिर असून याला रूद्रेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिरात एकाच दगडातून कोरलेली सव्वा दोन क्विंटल धान्य सामावेल, अशी दुर्मिळ पिंड आहे. अत्यंत कोरीव दगडाचे बांधकाम असलेले ५० फुट उंच, ८० फुट लांब व ३६ फूट रूंद असलेले हे मंदिर १००० ते १२०० वर्षापूर्वी वा त्याहीपूर्वी राष्ट्रकुटकालीन असावे, असे इतिहासतज्ञांचे मत आहे. मंदिराच्या प्रांगणात एक चतुर्मूख मूर्ती आहे. ती ब्रह्मदेवाची आहे. ही मूर्ती राष्ट्रकुटकालीन असून अशी मूर्ती क्वचितच पाहावयास मिळते. महाशिवरात्री यात्रेनिमित्त मंदिर परिसरात श्रीमद् महाशिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास रविवारपासून सुरूवात झाली आहे. हभप मयूर महाराज दरणे यांच्या अमृत वाणीने भाविक मंडळी मंत्रमुग्ध होतात. हा सोहळा २७ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. शिवपुराण कथा व भारूड दररोज रात्री ७ ते १० वाजेपर्यंत राहणार आहे.(वार्ताहर)

Web Title: Hemadpanthi started the journey of the Rudreshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.