गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:35 IST2018-02-21T00:34:51+5:302018-02-21T00:35:42+5:30
विदर्भातीलच नव्हे तर राज्यात गारपीट व वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या अस्मानी संकटाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भातीलच नव्हे तर राज्यात गारपीट व वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या अस्मानी संकटाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. गहू, तूर व चणा तसेच भाजीपाला, निंबू, आंबा व संत्रा पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे घेतलेले कर्ज कसे परत करावे, वर्षभर कसे जगावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. कापूस बोंडअळीने खाल्ला तर गारपीट व वादळी पावसाने अन्य पिके उद्ध्वस्त केली. शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होत आहे. यासाठी त्वरित शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याला किमान एकरी २० हजारांची मदत करावी. बोंडअळीचे पैसे अद्याप मिळाले नाही. ते देण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विनय डहाके, भरत चौधरी, निळकंठ राऊत, संजू म्हस्के, संजय भगत, रामदास कुबडे, पुंडलिक नागतोडे, कवडु बुरंगे आदी उपस्थित होते.